उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल प्रा.प्रदिप रोडे यांच्या हस्ते तुलसी शैक्षणिक समूहातील कर्मचाऱ्यांचा सत्कार
बीड(प्रतिनिधी):- येथील देवगिरी प्रतिष्ठान बीड संचलित तुलसी शैक्षणिक समूहातील कर्मचाऱ्यांचे दि २७ मार्च रोजी दुपारी ४ वाजता तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय बीड येथे वार्षिक आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याबैठकीत तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.एम.थोरात,उपप्राचार्य डी.जी.निकाळजे, तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईनचे प्राचार्य डॉ.अशोक धुलधुले, तुलसी इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य उमा जगतकर, नालंदा कॉलेज ऑफ फॅशन डिझाईनच्या प्राचार्य डॉ. शैलजा पैकेकर यांची उपस्थिती होती.यावेळी शैक्षणिक वर्षा मध्ये उल्लेखनिय कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा संस्थेचे प्रमुख प्रा.प्रदिप रोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रा.प्रदिप रोडे यांनी कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
याप्रसंगी बोलताना प्रा.प्रदीप रोडे म्हणाले की, तुलसी शैक्षणिक समूहातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या कार्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे . फुलांचा सुगंध काही अंतर असल्यावर येतो मात्र तुम्ही केलेल्या कार्याचा सुगंध दूरवर पसरत आहे असे त्यांनी सांगितले. प्रा.रोडे म्हणाले महाराष्ट्रात मी विविध ठिकाणी कामानिमित्त जातो तेथे तुलसी शैक्षणिक समूहाचा विषय निघतो ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. तुलसी शैक्षणिक समूहाला महाराष्ट्र टॉप वर न्यायचे असेल तर सांघिक भावना महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. आपल्यातील गर्व,मोह,मत्सर बाजुला सारुन इतरांचा आदर कसा करता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी कर्मचाऱ्यांना केले. नेपोलियन बोनापार्ट चे उदाहरण देत अशक्य काही नाही असे त्यांनी सांगितले आणि उत्कृष्ट कार्य केलेल्या करत असलेल्या आणि त्या मार्गावर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. याप्रसंगी आढावा बैठकीत तुलसी शैक्षणिक समूहातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, शिपाई मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment