तुलसी महाविद्यालयात मौखिक रोग तपासणी शिबिरास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दातांची काळजी घ्या डॉ. अशोक उनवणे यांचे आवाहन 

बीड(प्रतिनिधी):- शरीराच्या सर्व भागांची काळजी घेण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो मात्र अनेकदा दातांची नीट काळजी घेतली जात नाही ही बाब लक्षात घेऊन दातांची काळजी घ्या असे आवाहन डॉ. अशोक उनवणे यांनी केले.या मौखिक रोग तपासणी शिबिरास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय बीड येथे शनिवार दि.३० मार्च रोजी सकाळी ११:०० वा. मौखिक रोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये प्रमुख सहाय्यक म्हणून मुखरोग व चेहरा शल्यचिकित्सक डॉ. अशोक उनवणे, डॉ.अनघा उनवणे यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तुलसी महाविद्यालय प्राचार्य डॉ.एल.एम.थोरात, प्रमुख अतिथी उपप्राचार्य प्रा.डी.जी.निकाळजे,आय. क्यू.सी.ए. समन्वयक डॉ. योगिता लांडगे, कार्यक्रम अधिकारी विद्यार्थी कल्याण विभाग प्रमुख प्रा.समिर मिर्झा यांची उपस्थिती होती.  



पुढे बोलतांना डॉ.अशोक उनवणे म्हणाले की,सहसा जेव्हा आपण दातांच्या काळजीच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू लागतो तेव्हा दात पिवळे पडणे, पायरिया, पोकळी होणे, हिरड्यांमधून रक्तस्त्राव होणे आणि तोंड खराब होणे अशा समस्या दिसू लागतात त्यावर लवकरात लवकर निदान करणे गरजेचे आहे असे डॉ. अशोक उनवणे यांनी सांगितले. तसेच या समस्या दूर करण्यासाठी उपयोजना त्यांनी सांगितल्या. 
दातांच्या काळजीसाठी काय करावे
रोज गोड पदार्थ खाल्ले किंवा दातात चिटकणाऱ्या गोष्टी खाल्ल्या तर बॅक्टेरिया वाढण्याची संधी मिळेते हे उघड आहे, ज्यामुळे दातांमध्ये एकाच वेळी अनेक प्रकारच्या समस्या दिसू लागतात दातांची घाण दूर व्हावी आणि बॅक्टेरिया जमा होऊ नयेत असे वाटत असेल तर सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी टूथब्रशने दात स्वच्छ करा जे असे करत नाहीत त्यांच्यासाठी अडचण आहे. तसेच गुटखा आणि तंबाखू चघळणे ही केवळ सामाजिक कुप्रथा नसून यामुळे दात, हिरड्या आणि जिभेचे खूप नुकसान होते, हल्ली तरुणांपासून वृद्धांपर्यंत लोक या व्यसनाला बळी पडले आहेत ही वाईट सवय लवकर सोडली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. दातांची कितीही काळजी घेतली तरी महिन्यातून एकदा किंवा दोनदा डेंटिस्ट कडे तपासणी करावी यामुळे दातांच्या छोट्या-छोट्या समस्या ओळखल्या जाऊ शकतात आणि मग तुम्ही लवकरात लवकर उपाय करू शकता असे डॉ.अशोक उनवणे यांनी सांगितले. या मौखिक रोग तपासणी शिबिराचे आयोजन विद्यार्थी कल्याण विभाग यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.योगिता लांडगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.किशोर वाघमारे यांनी मानले याप्रसंगी तुलसी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी,विद्यार्थी, विद्यार्थिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी