तुलसी महाविद्यालयात ३० मार्च रोजी मौखिक रोग तपासणी शिबिर




बीड(प्रतिनिधी):- येथील देवगिरी प्रतिष्ठान बीड संचलित तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय बीड येथे दि.३० मार्च रोजी सकाळी १० वाजता मौखिक रोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुखरोग व चेहरा शल्यचिकित्सक डॉ. अशोक उनवणे या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या मौखिक आरोग्याची तपासणी करून मुखरोग व चेहरा याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.

मौखिक रोग तपासणी शिबिराचे आयोजन तुलसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.एम. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
यावेळी शिबिरामध्ये उपप्राचार्य प्रा.डी.जी.निकाळजे,डॉ. योगिता लांडगे यांची उपस्थिती राहणार आहे. या शिबिरामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपली मौखिक आरोग्य तपासणी करावी असे आवाहन तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय बीड आणि विद्यार्थी कल्याण विभाग प्रमुख प्रा.समीर मिर्झा यांनी केले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी