बीड येथे एक दिवसीय समता सैनिक दल शिबिराचे आयोजन



 बीड (प्रतिनिधी) दिनांक : 31 मार्च रविवार रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक दिवशीय समता सैनिक दलाचे शिबिर नागसेन बुद्ध विहार, पालवन चौक बीड येथे आयोजित करण्यात आले आहे. शिबिर सकाळी ९:०० वाजल्यापासून दुपारी ६:०० वाजेपर्यंत राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक चळवळ प्रबळ करण्यासाठी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले समता सैनिक दलाला 2027 मध्ये शंभर वर्षे (शताब्दी वर्ष) पूर्ण होत आहेत. त्या अनुषंगाने समता सैनिक दल वाढविणे, समाजामध्ये समता प्रस्थापित करणे, अन्यायाविरुद्ध पेटून उठणे, शोषित पीडित लोकांना न्याय देण्यासाठी समता सैनिक दल समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुता यावर आधारित एक लाख समता सैनिक तयार करणे, तरुणांना निर्व्यसनी, अभ्यासू, शीलवान, चारित्र्यवान आणि समाजाचे रक्षण करण्यासाठी तयार करणे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संस्थांचे व आंबेडकरी घराण्याचे रक्षण करणे तसेच विषमतेवर आधारित जात, लिंग, भेद यावर आधारलेली विषमता नष्ट करणे, संविधानाचे रक्षण करणे "संविधान के सन्मान में समता सैनिक दल मैदान मे" "घर तेथे समता सैनिक, गाव तिथे शाखा" याची पूर्तता करण्यासाठी हे शिबिर घेण्यात येत आहे. तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक चळवळ गतिमान करण्यासाठी व निर्व्यसनी तरुणांची फळी तयार करण्यासाठी, समाजावर होणारे अन्याय - अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी तरुणांनी या समता सैनिक दलामध्ये सामील व्हावे व 14 एप्रिल च्या अगोदर आपला सैनिक कोड नंबर घेऊन गणवेशामध्ये 14 एप्रिलला, जय भीम महोत्सवदिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी तयार व्हावे. असे आवाहन समता सैनिक दलाचे मेजर कॅप्टन राजाभाऊ आठवले (भा. बौद्ध महासभा संरक्षण उपाध्यक्ष बीड (प.) करत आहेत.

 

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी