ज्योती ताईंना उमेदवारी मिळाल्यास पाठिंबा देण्याबाबत बाळासाहेबांकडे आग्रह धरू -अशोक हिंगे


बीड (प्रतिनिधी ) महाविकास आघाडी कडुन‌ ज्यातीताई विनायकराव मेटे यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांना पाठिंबा देण्याबाबत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या कडे आग्रह धरू अशी माहिती वंचित चे मराठवाडा अध्यक्ष अशोकराव हिंगे पाटील यांनी दिली आहे.
  ते पुढे म्हणाले कि भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी मधे जाण्याची पुर्ण मानसिकता बाळासाहेब आंबेडकर यांची होती परंतु महाविकास आघाडी घ्या नेत्यांच्या अडेलतट्टू धोरणामुळे आमचा समावैश होईल का ते माहीत नाही परंतु जर महाविकास आघाडी कडुंन ज्योतीताई विनायकराव मेटे यांना उमेदवारी जाहीर झाली तर वंचित चा पाठिंबा देण्या बाबत आम्ही आग्रह धरणार आहोत. मेटे साहेबांचं पुर्ण जिवन संघर्ष मय होत. मराठा आरक्षणासाठी त्यांचा लढा कायम चालु होता. मराठा आरक्षणासाठी च्या बैठकीला जात असताना झालेल्या अपघातात त्यांचा अकाली मृत्यु झाला.ही हळहळ बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्याशीही त्यांचे स्नेहाचे संबंध होते.
 महाविकास आघाडी ने ज्योती ताईंना उमेदवारी दिल्यास आम्ही त्यांच्या विजयासाठी बाळासाहेब कडे पाठिंबा देण्याबाबत आग्रह धरणार आहोत. व ते ही आमच्या भावनांचा मान ठेवतील. हिच मेटे साहेबांना श्रद्धांजली ठरणार आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी