महावितरणच्या गलथान कारभारा मुळे दलीतवस्ती मधील लोक रहातात जीव मुठीत धरून

महावितरणच्या गलथान कारभारा मुळे दलीतवस्ती मधील लोक रहातात जीव मुठीत धरून
 संभाव्य धोका ओळखून घरावरील तारा 
इतरत्र हालवा नसता आंदोलन करू -शेलार
पाटोदा (प्रतिनिधी)पाटोदा तालुक्यातील 
दासखेड येथील जवळपास 20 ते 25 घरे वजा झोपडपट्टी भागातून गेलेल्या रस्त्यावरून घराच्या छताच्या ऐन मध्यावरून गेल्या 25 ते 30 वर्षापासून 11 केव्हीची विद्युत वाहिनी गेलेली आहे. सदरील ठिकाणी लोकांची रहाण्याची निवासस्थाने असल्याने तेथून गेलेली विद्युत लाईन ही या रस्त्यावरील अनेकांच्या घरावरून गेलेली आहे. विद्युतवाहिनी घराच्या छताच्या अत्यंत जवळ असल्याने आणि तीची अवस्था जीर्ण झालेली असल्याने संभाव्य धोका होऊन जिवीतहानी होण्याची शक्यता आहे. या भागात राहणारे रहिवाशी या तारे मुळे जीव मुठीत धरून येथे रहात आहेत. काही दिवसापूर्वी या तारेचा शॉक लागून विकास देवडे नावाचा व्यक्ती मरण पावल्याची दुर्देवी घटना घडलेली आहे तसेच हरिदास माने या व्यक्तीला विद्युत शॉक लागला होता. हा रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे.
या बाबत सबंधित खात्याकडे,त्यांच्या वरिष्ठांकडे अनेकदा लेखी/तोंडी पाठपुरावा केला असतानाही या बाबत कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही. वाऱ्या वादळाने पोलवरील तार तुटण्याचा धोका जास्त असल्याने येथे राहणे जिवावर बेतण्यासारखे आहे.तरी मा. साहेबांना विनंती करण्यात येते की, संबंधीत खात्याला या बाबत सुचना देवून तेथील विद्युत वाहिनी इतरत्र हटविण्याबाबत आदेशीत करावे. अन्यथा आम्हाला आमच्या न्याय मागणीसाठी आंदोलनात्मक पवित्रा घेवून मतदानावर बहिष्कार टाकावा लागेल असे लेखी निवेदन मा तहसीलदार साहेब पाटोदा यांना देण्यात आले या निवेदनावर खालील लोकांच्या सह्या आहेत हरिदास शेलार शहादेव माने शुभम शेलार नवनाथ शेलार लक्ष्मण मंडलीक अशोक निर्माळ अभिमान शेलार 
युवराज कोकाटे बाळासाहेब कोकाटे रामदास माने महादेव कोकाटे यांच्या सहाय्या आहेत

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी