शिरुर येथे पवित्र रमजान निमित्त शिरुर तालुका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने रोजा इफ्तार पार्टी संपन्न
बीड जिल्हा ( प़तीनिधी --गोरख मोरे ) :
मा.संपर्क प्रमुख किशोरजी पोतदार साहेब यांच्या आदेशाने , मा.लोकसभा प्रमुख मा.आ.सुनिल दादा धांडे यांच्या आशीर्वादाने मा.शिवसेना जिल्हा प्रमुख परमेश्वरजी सातपुते सर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शिरुर तालुका शिवसेच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते .
मा.शिवसेना उपजिल्हाप्रमुख आजिनाथ खेडकर , शिवसेना तालुका प्रमुख सोपान काका मोरे यांनी इफ्तार पार्टी चे आयोजन केले होते .
या प्रसंगी बीड शिवसेना शहरप्रमुख निजामभाई शेख सरकार , शिवसेना नेते विनोद पाटिल गुंड , जिल्हासंघटक रतनतात्या गुजर , शिरुर उपतालुका प्रमुख संजय सानप , हाफिज अब्दुल जब्बार साहेब , व्यापारी संघटनेचे अध्यक्ष फयाजभाई शेख , अजीम आतार , शब्बीर पठाण , मुन्ना शेख , वसीम शेख , नीहाल पठाण , सर्फराज आतार , शेख इलाही , सत्तार शेख , सय्यद सलीम , जब्बार पठाण , नजीर शेख , आमीन शेख , खुद्बुद्दीन शेख , अकबर पठाण , सय्यद सत्तार , हारून पठाण , हारून अत्तार , समीर पठाण , अय्युब सय्यद , शाहबाझ शेख आदी बांधव उपस्थित होते .
इफ्तार पार्टी ही शिरुर शहरातील मुख्य मज्जित येथे , शिरुर कासार शिवसेनेच्या वतीने रोजा इफ्तार पार्टीचे खास आयोजन करण्यात आले होते . या पार्टिला शहारातील बहुसंख्य मुस्लिम / हिंदू बांधव आवर्जुन उपस्थित होते . या पवित्र रमजान निमित्त बीडमध्ये हिंदू व मुस्लिम ऐक्याचे महामेरु मा.शिवसेना जिल्हा प्रमुख परमेश्वरजी सातपुते सर , व शहर प्रमुख निजाम सरकार शेख हे आहेत . यांनी दोन्ही समाजाला बांधण्याच काम शिवसेनेच्या माध्यमातून ऊध्दवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने चालवले आहे . या जोडगोळीच्या कामाचे कौतुक सर्वत्र होत असून , त्याच धर्तीवर आज इफ्तार पार्टिचे आयोजित करण्यात आले होते . या पार्टीला दोन्ही समाज बांधवांनी साथ दिली असून, ही इफ्तार पार्टी खेळी -मेळीच्या च्या वातावरणात संपन्न झाली .
Comments
Post a Comment