पाटोदा महावितरणला आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीचा विसर


पाटोदा (प्रतिनिधी)महाराष्ट्रासह राज्यभरातील लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्याचसोबत आचारसंहितादेखील जाहीर झाली आहे.सर्व राजकीय पक्ष,कार्यकर्ते सरकारी आस्थापनांनी याचे पालन करणे अपेक्षित असते.पण अनेकदा सरकारी आस्थापनांना याचा विसर पडल्याचे दिसून येते.असेच दृश्य पाटोदा महावितरण कार्यालयात दिसून आले आहे.लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने घोषित केला व त्या दिवसापासूनच आदर्श आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा केली. त्यामुळे शासकीय सभा समारंभ बंद झाले.परंतु महावितरण कार्यालयातील भिंतीवरील मंत्र्यांच्या फोटो असलेल्या योजनेचे स्टिकर महावितरण कार्यालयात जागोजागी दिसुन येते असल्यामुळे आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीचा पाटोदा महावितरण कार्यालयाला विसर पडला की काय, असा प्रश्न उपस्थित होत आसुन बीड लोकसभा निवडणूक अधिकारी या गंभीर घटनेकडे लक्ष देणार का असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी