श्री. छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालय, आष्टी येथे रिमोट सेन्सिग,जी.आय.एस, जी.पी.एस या नवीन तंत्रज्ञानवर आधारित तीन दिवसीय कार्यशाळा संपन्न


आष्टी (प्रतिनिधी--- गोरख मोरे ) : 
श्री. छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर, कृषी महाविद्यालय, आष्टी येथे कृषिविद्या विभागा अंतर्गत रिमोट सेन्सिग,जी.आय.एस, जी.पी.एस. नवीन शेती तंत्रज्ञानावर आधारित तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन कृषिविद्या विभाग आणि अल्बेडो फाउंडेशन नाशिक यांच्या सहयोगाने करण्यात आले होते . हि कार्यशाळा ३ दिवसाच्या कालावधीत पार पाडण्यात आली .कार्यशाळेसाठी प्रमुख प्रशिक्षक म्हणूनअल्बेडो फाउंडेशन नाशिक डायरेक्टर इंजि. विक्रांत निकम हे होते . कृषी महाविद्यालयमध्ये शिकत असणाऱ्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्याच्या अभ्यास क्रमात हा नवीन विषय देण्यात आला आहे . त्या विषयाच्या संदर्भात प्रात्यक्षीक सोप्या पद्धतीने समजण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यशाळेत इंजी.निकम यांनी रिमोट सेन्सिग,जी.आय. एस, जी.पी.एस या विषयाशी निगडित असे सर्व प्रकारचे तंत्रज्ञान विद्यार्थांना सांगितले . त्याच प्रमाणे या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आपल्या शेती मधे याचा कसा बदल घडून आणु शकतो हे सांगितले . कोणत्याही भौगोलिक माहितीचे संग्रहण, संकलन, संघटन आणि विश्‍लेषण करणाऱ्या संगणकीय प्रणालीला भौगोलिक माहिती प्रणाली म्हणतात . पृथ्वीवरील कोणत्याही स्थळाची भौगोलिक माहिती मिळविणे, साठविणे, तिची मांडणी करणे आणि तिचे सादरीकरण करणे ही या प्रणालीची कार्ये आहेत. या प्रणालीमध्ये एखाद्या स्थानासंबंधी कोणतीही माहिती साठविता येते आणि त्यासाठी संगणकांचा वापर केला जातो . अशा संगणकांमध्ये त्या स्थानांसंबंधी मिळालेली सर्व माहिती साठविता येईल आणि माहितीचे विश्‍लेषण करता येईल, अशी आज्ञावली (सॉफ्टवेअर) असते . प्राथमिकत: अशा प्रणालीत एखादे स्थान हे त्या स्थानाचे अक्षांश-रेखांश आणि समुद्रसपाटीपासूनची उंची अशा निर्देशकांनी ठरविले जाते आणि ते स्थान ओळखण्यासाठी देश, राज्य, प्रदेश, पिन क्रमांक इ. माहितीची नोंद केली जाते. तसेच तेथील हवामान, भूरूपे, लोकसंख्या, वाहतुकीचे मार्ग, वन्यजीव इ. माहिती साठविली जाते. जे भौगोलिक घटक त्या प्रणालीच्या उपभोक्त्यांना गरजेचे वाटतील अशा बहुविध घटकांची माहिती या प्रणालीत असते. या ‍माहितीवर आवश्यक ते संस्करण केले जाते, तिची योग्य मांडणी केली जाते आणि नकाशे, तक्ते, आलेख, आकृत्या व मजकूर इ. स्वरूपात ती सादर केली जाते. याच प्रमाणे एखाद्या प्रदेशातील पर्जन्य, तापमान, वनस्पती, प्राणी, जमीन इ. घटकांची माहिती या प्रणालीद्वारे मिळते आणि त्यामुळे आपण शेती मधील उत्पन्न वाढू शकतो.सध्याच्या युगामध्ये कृषी क्षेत्रात ड्रोन टेक्नॉलॉजी ही नवीन संकल्पना शेतकरी व विद्यार्थ्यांना अवगत करणे याविषयी इंजि. विक्रांत निकम सरांनी प्रात्यक्षिक घेतले व ड्रोन टेक्नॉलॉजी संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.सोप्या शब्दात सांगायचे झाले तर ड्रोन हा उडण्यास सक्षम असलेला रोबोट आहे आणि हा रोबोट रिमोट कंट्रोल द्वारे मानव नियंत्रित करू शकतो. याद्वारे आपण कीटकनाशक बुरशीनाशक व खतांचा वापर पिकांना करू शकतो.कार्यशाळेचे नियोजन कृषीविद्या प्रमुख प्रा. एस. एल.बनकर ,प्रा. जी.जे.नवसरे आणि हवामाशास्त्र विभाग प्रमुख प्रा. आर.एस.हांगे यांनी केले.तीन दिवसीय कार्यशाळा झाल्यावर कु.शशांक लेकीनी, कु. ज्ञानेश्वर वारांगुळे, कुमारी प्रियांका शेळके,कुमारी अदिती राऊत यांनी विद्यार्थ्या मार्फत मनोगत व्यक्त केले.ज्या विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत सहभाग घेतला अश्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यशाळे मध्ये चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन केल्यामुळे महाविद्यालय प्राचार्य डॉ. एस.आर.आरसुल यांनी प्रशिक्षक इंजि.विक्रांत निकम यांचे अभिनंदन केले व त्यांचा सत्कार करून सन्मानचिन्ह दिले.कार्यशाळेच्या कार्यक्रमासाठी संस्थेचे प्रशासनाधिकारी डॉ. डी. बी. राऊत, प्राचार्य डॉ. एस. आर. आरसूळ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते . कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा. आर.एस.हांगे यांनी मानले .

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी