मल्टीपर्पज मैदानानंतर कॅनॉल चौकातही आचारसंहितेची अंमलबजावणी; ती मशालही झाकली!
अलर्ट प्रशासन - गतिमान शासन; नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करावे - एस.एम.युसूफ़
मल्टीपर्पज मैदानानंतर कॅनॉल चौकातही आचारसंहितेची अंमलबजावणी; ती मशालही झाकली!
बीड (प्रतिनिधी) - शहरातील मल्टीपर्पज मैदानानंतर कॅनॉल चौकातही आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात आली असून ती मशालही झाकण्यात आली आहे. यामुळे प्रशासन अलर्ट असेल तर शासन कसे गतिमान करता येते याची चुणूक सध्या बीड शहरात दिसून येत असून नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, सध्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेली आदर्श आचारसंहिता देशभरात लागू आहे. या अनुषंगाने अनेक पथ्य पाळावे लागत आहे. तरीही कुठे ना कुठे काही ना काही राहुन किंवा सुटून जाते. अशाच प्रकारे बीड शहरातील मुख्य चौकांंपैकी एक असलेला तुळजाई कॅनॉल चौक आहे. जिथे हातात धगधगती मशालची प्रतिकृती बीड नगर परिषदेकडून लावण्यात आलेली आहे. मशाल हे चिन्ह या लोकसभेच्या निवडणुकीत एका राजकीय पक्षाचे असणार आहे. यामुळे या मशालीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी 'आचारसंहितेतही ही मशाल सताड उघडी; तिला झाका' या शीर्षकाने बातमी प्रकाशित केली होती. ही बातमी प्रकाशित होताच जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन ही मशाल झाकून दोरीने बांधून टाकली. यामुळे आदर्श आचारसंहितेचे पालन तर झालेच शिवाय प्रशासन अलर्ट असले तर शासन कसे गतिमान करता येते याचा अनुभव बीड शहरवासीयांना आला असून प्रशासनाकडून चांगले काम करून घेण्यासाठी नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.
Comments
Post a Comment