नाशिक लोकसभा मतदारसंघावरील महायुतीचा तिढा कायम ?


ईगतपुरी तालुका प्रतिनिधी 
(नवनाथ गायकर यांजकडुन) -
   - नाशिक लोकसभा मतदारसंघ एकीकडे महा विकास आघाडीतंर्गत उ.बा.ठा.शिवसेना गटाला सुटल्याचे निश्चिंत झाले आहे. या जागेवर उ.बा.ठा.कडुन विजय करंजकर कि अन्य कोणी एवढीच औपचारीक घोषणा बाकी आहे. दुसरीकडे महायुतीत मात्र जागावाटप निश्चिंत झाले नसुन नाशिक वर सगळेच दावा करत असल्याने तिढा कायम असल्याचे दिसत आहे. 
  महायुती सध्या जोरावर असल्याने इच्छुकाचीं भाऊगर्दी ही मोठी आहे.आणि हीच डोकेदुखी महायुती पुढे आहे.
  नाशिक च्या जागेवर नियमाने पाहु गेले तर शिवसेनेचा प्रथम हक्क आहे. या जागेवर सन २०१४ व २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत बाजी मारत हेंमत गोडसे हे विजयी झाले होते.त्यामुळे ही जागा शिवसेनेची हक्काची आहे. मात्र या जागेवर भाजपने दावा ठोकल्याने पेच निर्माण झाला आहे. भाजपचे दिनकर पाटील यांनी तर जागा वाटप निश्चिंत होण्यापुर्वीच या जागेवर दावा ठोकला आहे.नुसता दावाच नाही तर पुर्ण मतदारसंघ पिंजुनही काढला आहे. तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातुन त्यांनी प्रचारातही आघाडी घेतलेली आहे. आता हे सगळे दिनकर पाटिल स्वत;ची खासदार होण्याची महत्त्वाकांक्षा पुर्ण करण्याहेतुने करत आहेत कि भाजपातुनच त्यांना आशिर्वाद आहे हे गुलदस्त्यातच आहे.पण एकुण पाटलाचां आक्रमक पवित्रा पाहता ते ऐकतील असे निश्चिंत वाटत नाही. 
  दुसरीकडे स्वामी श्रीकंठानंद महाराज यांनी ही नुकताच भाजप मध्ये प्रवेश केला आहे. ते ही लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. नाशिक शहर व परिसरात ते बरेचसे सक्रिय असुन प्रखर राष्ट्रवाद विचाराचे प्रसारक म्हणुन ते सुपरिचीत आहेत. 
   याच बरोबर जनार्दनस्वामी चे उत्तराधिकारी तथा महामंडलेश्वर शांतीगीरी महाराज यांनी ही प्रचाराची राळ उडवली आहे. राजकारणाचे शुद्धीकरणचा नारा देत ते रिंगणात उतरले आहेत. विश्वसनीय माहितीनुसार ते ही भाजप व शिवसेनेच्या संपर्कात आहे. 
   शिवसेना, भाजप बरोबरच महायुतीतील तिसरा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ने ही या जागेवर दावा ठोकला आहे. सलग दोन पराभवामुळे नाशिक जिल्हयावर ढिली झालेली पकड मजबुत करण्याच्या इरादयाने भुजबळानीं या जागेवर दावा ठोकला आहे. या शिवाय सिन्नर चे आमदार माणिकराव कोकाटे यांचीही दावेदारी प्रबळ मानली जाते आहे. 
  हे कमी कि काय म्हणुन महायुती त येऊ पाहणारी मनसे ही या जागेवर दावा ठोकत आहे. येथुन दस्तुरखुद्द राज ठाकरे यांनी निवडणुक लढवावी अशी मनसैनिकाचीं मागणी आहे. 
  एकुणच नाशिक च्या जागेवर सगळयानींच दावा ठोकल्याने त्रांगडे झाले आहे. 
  थोडयाच दिवसात हा पेच कसा सुटतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्या नंतर महायुती एकदिलाने लढेल का हा ही कळीचा मुद्दा आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी