अनाया फातिमा चा आयुष्यातील पहिला रोज़ा पूर्ण


बीड (प्रतिनिधी): शहरातील ज्येष्ठ पत्रकार तथा सेवानिवृत्त प्राध्यापक सी.आर.पटेल यांची नात अनाया फातिमा माजेद पटेल हिने आपल्या आयुष्यातील पहिला रोज़ा वयाच्या सातव्या वर्षी पूर्ण केला.
सध्या पवित्र रमजान महिन्याचे रोज़े सुरू आहेत. रमज़ान महिना आता शेवटच्या टप्प्यात आला असून काल रमज़ानचा वीस वा रोज़ा होता. हा रोज़ा अनाया फातिमा हिने ठेवला व तो यशस्वीरित्या पूर्ण केला. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने सूर्य अक्षरशः आग ओकत आहे. तप्त उन्हामुळे भल्याभल्यांच्या जीवाची लाहीलाही होत आहे. अशा अवस्थेत लहान लहान मुली व मुले आपल्या आयुष्यातील पहिला रोज़ा धरत आहे. यामागे अल्लाहकडून रोज़ेदारांना मिळणारी अदृश्य ताकद असते म्हणूनच चिमुकले रोज़ेदार कमी वयातही आपले रोज़े पूर्ण करू शकतात. असेच अनाया फातिमानेही वयाच्या सातव्या वर्षी आपल्या आयुष्यातील पहिला रोज़ा पूर्ण केला. याबद्दल तिचे सर्व नातेवाईक, सहारा कॉलनी येथील रहिवासी यांनी अभिनंदन केले व त्याने यापुढेही दरवर्षी रमज़ान महिन्याचे पूर्ण रोज़े ठेवावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी