सांकवाळ येथे ३५०वा शिवराज्याभिषेक जयंती महोत्सव आणि तिथीनुसार ३९४ वा शिवजयंती उत्सव सोहळा आयोजन

 
गुरुवार दिनांक २८ मार्च २०२४ रोजी मुलगाव तालुक्यातील सांकवाळ प्रभाग क्रमांक १ येथे सन २०२२ पासून शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येत आहे. यावर्षी देखील मुरगाव शैक्षणिक संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य रंगमंच उभारून सांय. ०४.०० ते रात्री ०८.०० पर्यंत शानदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या फोंडा किल्ल्याच्या परिसरातील लहान मावळे आणि गोमंतकाची राजधानी पणजी शहराच्या परिसरातील शिवप्रेमीं कलाकार या उत्सवात सहभागी होणार आहेत. स्थानिक भगीनींच्या लेझीम पथकाने मिरवणूक काढण्यात येणार आहे. गोमंतकातील भाजप कर्नाटक सेल चे सचिव मा श्री राजेश शेट्टी यांच्या हस्ते लेझीम पथकाने मिरवणूकीची सुरूवात होणार आहे. मिरवणुक विद्यानगर सांकवाळ बस स्थानका ( जंक्शन/ सिग्नल ) वरून निघणार आहे आणि महाविद्यालयाच्या प्रांगणातील अर्थात मैदानावरील भव्य अशा रंगमंचापर्यत पोहचणार आहे. तदनंतर विविध ऐतिहासिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन आणि विशेष असे व्याख्यान आयोजित केले आहे. विविध संमेलने, परिसंवादात सहभाग, गोवा, कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यांत विविध विषयांवर व्याख्याने, समिक्षक, आणि माजी प्राध्यापक म्हणून अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेले वक्ते मा श्री कृष्णाजी कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत तसेच ३९४ व्या जन्म सोहळ्याला प्रमुख पाहुणे या नात्याने राज्यसभेचे खासदार मा.श्री . सदानंद शेट तानावडे, गोवा राज्यातचे कला, क्रिडा व सांस्कृतिक मंत्री मा श्री गोविंद गावडे, समाज सेविका व शिक्षीका मा सौ सुलोक्षना प्रमोद सावंत, कुठ्ठाळीचे विद्यमान आमदार आणि खादी ग्रामोद्योग चे अध्यक्ष मा श्री अंटोनियो वाझ, संभाजीनगर (द. गोवा ) चे लाडके आमदार आणि दक्षिण गोवा नगरनियोजन व विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष मा श्री कृष्णा ( दाजी) साळकर, गोवा पंचायत महिला शक्ती अध्यक्षा, गोवा राज्य महिला मोर्चा अध्यक्षा , जिल्हा परिषद सदस्या, राष्ट्रीय पातळीवरील पंचायत महिला शक्ती अध्यक्षा असलेल्या एडवोकेट मा सौ अनिता अजय थोरात, भाजप उत्तर भारतीय सेल अध्यक्ष मा श्री अजय लांबा, सांकवाळ ग्रामपंचायतचे माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच मा श्री गिरीश पिल्ले, सांकवाळ ग्रामपंचायतीचे पंच सदस्य,मा श्री संतोष देसाई, समाज सेवक व लघु उद्योजक मा श्री तुळशीदास फळ देसाई, विद्यानगर रहिवासी कल्याण संघटनेचे अध्यक्ष मा श्री सागर तोरसकर आणि अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत गोवा प्रमुख व छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य सेवा मंडळ चे अध्यक्ष मा श्री राजाराम पाटील इ मान्यवर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भाजप कर्नाटक सेल चे सचिव मा श्री राजेश शेट्टी लाभलेले आहेत. उत्साहाच्या वातावरणात संपन्न होणा-या या जन्मोत्सव सोहळ्याला विद्यानगर सांकवाळ परिसरातील मराठमोळ्या, बाल कलाकारांचा छत्रपतींचे स्मृतीचिन्ह देवून सन्मानित करण्यात येणार आहे. सांकवाळ परिसरातील शिवप्रेमींनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि आम्हाला उपकृत करावे असे आवाहन कार्यकारी मंडळाने केले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी