शिरूर शहरातील पाणीपुरवठा / पाईपचे लिकेज तात्काळ काढून नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत करा -खेडकर / मोरे



बीड जिल्हा(प्रतिनिधी-गोरख मोरे ) :
  बीड जिल्ह्यातील शिरूर कासार शहरातील जिजामाता चौकात शहरात पाणीपुरवठा/ पाईप लिकेज होऊन हजारो लिटर पाणी वाया जात आहे . शहरातील या भागातील नागरिकांना विकत पाणी घेण्याची वेळ आली असून , या भागात पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे .
  तरी जिजामाता चौकातील पाईपचे लिकेज तात्काळ काढून , शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत करावा , अशा आशयाचे निवेदन शिरूर कासार येथील नगरपंचायत चे मा . मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे .
  संबंधित मा. मुख्याधिकारी साहेबांनी सदर निवेदनाची तात्काळ दखल घेऊन शिरूर शहरातील नागरिकांना तात्काळ सुरळीत पाणीपुरवठा जर करण्यात आला नाही तर , उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने जिजामाता चौकातील पाईप लिकेजच्या जागी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल , व पुढील होणाऱ्या परिणामास शिरूर कासार नगरपंचायत कार्यालय जबाबदार राहील , असा इशारा असे प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे बीड उपजिल्हाप्रमुख श्री आजिनाथ खेडकर / शिरूर कासार उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे तालुकाप्रमुख सोपान काका मोरे यांनी दिला आहे .

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी