आत्ताची सर्वात मोठी बातमीः प्रकाश आंबेडकरांची मनोज जरांगे यांच्या सोबत नवी आघाडी ?

अकोल्यातून प्रकाश आंबेडकर यांना उमेदवारी 

अकोला : राज्याच्या राजकारणात नवा द्विस्ट आला आहे. कारण वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी थेट मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यासोबत नवी आघाडी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, नव्या आघाडीची घोषणा केली. दुसरीकडे प्रकाश आंबडेरांनी जरांगेंसोबत आघाडी केल्याने ते महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर बोलताना म्हणाले की, "काल राज्य कार्यकारिणीची बैठक झाली त्यात काही निर्णय झालेत. काल रात्री मी मनोज जरांगे पाटील यांना भेटलो.विस्ताराने बोलणे झाले. त्यात ओबीसीसोबत आघाडीचा निर्णय घेतला गेला. मुस्लिम, जैन समाजाला उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. जास्तीत जास्त उमेदवार गरीब वर्गातील असतील.पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना जरांगेंचं समर्थन असेल. ते त्यांची अंतिम भूमिका 30 तारखेला घेतील. जरांगेंनी 30 तारखेपर्यंत थांबायची विनंती केली. त्यांची विनंती मान्य केली. जरांगे आणि दोघे मिळून लढणार" वंचितची पहिली उमेदवार यादी जाहिर.

 अकोला : प्रकाश आंबेडकर

भंडारा-गोंदिया : संजय केवट

गडचिरोली : हितेश पांडूरंग मडावी

चंद्रपूर : राजेश बेले

बुलडाणा : वसंतराव मगर

अमरावती : प्राजक्ता पिल्लेवान

वर्धा : प्रा. राजेंद्र साळुंके

यवतमाळ-वाशिम : खेमसिंग पवार

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी