मान्सूनपूर्व नालेसफाईच कागदोपत्रीच ,नगरपरिषद बीड भ्रष्टाचार प्रकरणात कारवाईसाठी लक्ष्यवेधी होडी आंदोलन
बीड नगरपालिकेमार्फत मान्सूनपूर्व नालेसफाईच्या नावाखाली कागदोपत्रीच बोगस कामे दाखवुन लाखो रूपयांचा अपहार केला असून शहरातील मुख्य रस्ते, शासकीय कार्यालये,बाजारपेठा, शाळा एकंदरीतच शहरालाच तलावाचे स्वरूप आले असून चारचाकी दुचाकी इंजिनमध्ये पाणी शिरल्यामुळे बंद पडत असुन पादचा-यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत असून त्याच्या निषेधार्थ बीडकरांना होडी,नाव साठी माफक दरात कर्ज उपलब्ध करून बीड नगरपरिषदेला ग्रामपंचायत दर्जा देण्यात यावा आदि.मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी होडी/नाव चालवा आंदोलन करण्यात येऊन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना निवेदन देण्यात आले आंदोलनात अड.संगिता धसे,किस्किंदाताई पांचाळ,संगीता सांगोळे,शेख युनुस,,रामनाथ खोड, मोहम्मद मोईज्जोदीन,सय्यद आबेद,शेख मुबीन,बलभीम उबाळे आदिंनी सहभाग घेतला.
मान्सूनपूर्व लाखो रूपयांची नाल्यासफाई कागदोपत्रीच; गैरव्यवहार प्रकरणात कारवाई करा
शहरातील बहुतांश भागात नाल्याची कामेच नाहीत तसेच अपुर्ण असलेल्या नाल्याची नियमित साफसफाई नाही मान्सूनपूर्व स्वच्छतेसाठी आलेल्या लाखो रूपयांच्या निधीचा तसेच शासनाकडून प्राप्त विशेष निधीचा कागदोपत्रीच कामे दाखवुन सत्ताधारी नगरपरिषद आधिका-यांशी संगनमत करून लाखो रूपयांचा अपहार करण्यात येतो. सत्ताधाऱ्यांकडून मात्र साफसफाईचे सोशल मिडीयावर तसेच दैनिकात बातम्याद्वारे विकासाच्या पर्वाचे पोकळ दावे केले जातात ते नुकत्याच पडलेल्या पावसाने शहराला तलावाचे स्वरूप दिसल्याने फोल ठरत आहेत. त्यामुळेच संबधित प्रकरणात उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी.
घनकचरा व्यवस्थापनाचे महिन्याकाठी २७ लाख तर वर्षाकाठी साडे तीन कोटो पाण्यात
बीड नगरपालिकेमार्फत शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी "कनक एन्ट्रप्रायजेस अमरावती "कंत्राटदाराला महिन्याकाठी २७ लाख व वर्षाकाठी साडे तीन कोटी रूपये देण्यात येतात मात्र प्रत्यक्षात कामे होतच नाहीत,नियमित घंटागाडी पाठवणे,कचरा उचलणे,गल्लोगल्ली कचरा संकलन करणे आदि कामे कागदावरच असून नगरपरिषद आधिकारी,पदाधिकारी लाभार्थी असल्याने मुग गिळुन गप्पच असतात.घनकचरा बिंदुसरा नदीपात्रात टाकुन पात्र दुषित करण्यात येते.पावसाने नाल्या तुडुंब भरून वाहु लागल्यामुळे
सर्वत्र दुषित पाणी झाले असून रोगराई पसरून नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असून तातडीची उपाययोजना करणं गरजेचं आहे.
बिंदुसरा,करपरा नदीपात्रातील नदी,ओढे,नाली अनाधिकृत प्लाॅटींग घातक; सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा
बीड शहरातील नदी,ओढे,नाले तसेच शहरातील बिंदुसरा,करपरा नदी पात्रातील अतिक्रमण करून प्लाॅटींग करणा-या भविष्यात पुरपरिस्थिती निर्माण झाल्यास वित्त व जिवित हानीस जबाबदार भुमाफियां तसेच नगरपरिषद ,भुमिअभिलेख,रचनाकार,जलसंपदा विभागातील संबधित आधिका-यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत.
Comments
Post a Comment