खा.सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्यावतीने महिला आरोग्य तपासणी शिबीर
बीड (प्रतिनिधी):- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रणरागिनी, महाराष्ट्राचा बुलंद आवाज खा. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त अल्पसंख्यांक आघाडीच्या बीड शहराध्यक्षा शकीला सय्यद यांनी जिल्हा रूग्णालयात महिला आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. उषाताई दराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा रूग्णालयाचे डॉ. शहाणे, राष्ट्रवादीच्या प्रदेश सचिव कमलताई निंबाळकर, प्रदेश उपाध्यक्षा प्रज्ञाताई खोसरे, पत्रकार आयेशा शेख, जिल्हा सचिव राणीताई शेख, प्रदेश सचिव ओबीसी सेलच्या संघटन सचिव मिनाक्षीताई देवकते यांची प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खा. सुप्रियाताई सुळे यांचा दि. 30 जून रोजी 2022 वाढदिवस त्यानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या वतीने जिल्हा रूग्णालय येथे महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात 50 महिलांच्या आरोग्याची तपासणी करून औषधोपचार देण्यात आला. सदरील शिबीर राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्याक आघाडीच्या बीड शहराध्यक्षा शकीला सय्यद यांनी आयोजित केला होता. सदरील शिबीर संपन्न झाल्यानंतर सर्व महिला पदाधिकार्यांनी केक कापून खा.सुप्रियाताई सुळे यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी मंगलताई जगताप, शहराध्यक्षा रेहाणा पठाण, जेबा शेख, पूनम वाघमारे, स्नेहाताई खंडागळे, सारिका यादव यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Comments
Post a Comment