वडवणी ते चिंचोटी रस्ता बनला मौत का कुआखडा चुकवा बक्षीस मिळवा

 रस्त्याचे काम तात्काळ करा अन्यथा वडवणी रास्ता रोको :- विनोद काकडे, प्रकाश उजगरे

 वडवणी वार्ताहर
वडवणी ते चिंचोटी हा रस्ता खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी दुर अवस्था निर्माण झाली असून या रस्त्यावर धोकादायक व मोठमोठे खडे झाले आहेत.या खड्या मध्ये पावसाचे पाणी साचून वाहनधारकांना मोठी काटेवरची कसरत करावी लागत आहे.त्यामुळे हा रस्ता मोतकाकुवा बनला असून खड्डा चुकवा बक्षीस मिळवा अशी म्हणण्याची वेळ आली आहे. या अगोदरही अर्ज विनंत्या करूनही या रस्त्याकडे प्रशासनाने व लोकप्रतिनिधी कडुन दुर्लक्ष केले आहे.या खड्डामय रस्त्याचे काम तात्काळ करा अन्यथा बीड परळी हायवे वर रस्ता रोको करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा संघटक विनोद काकडे रिपब्लीकन वि सेना जिल्हा अध्यक्ष प्रकाश ऊजगरे यांनी तहसिलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाला यांना निवेदना द्वारे दिला आहे.
     सविस्तर वृत्त असे की वडवणी ते चिंचोटी हा पाच किलोमीटरचा रहदारीचा रस्ता असून या रस्त्यावर  दिड दोन फुटाचे मोठ मोठे खडे पडले आहेत.या
 रस्त्यावरून चिंचोटी,हरीचंद्र पिंपरी,चिंचवडगाव, काडीवडगाव,देवडी,ख लिमगाव,देवगाव,खापरवाडी अदी गावातील जनतेला तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी एकमेव रस्ता असल्याने येथील नागरीकांना व शाळेतील विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाचा आधार घेत जिव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.या खडामय रस्त्यामुळे दुचाकी स्वरांना वाहन धारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.या खड्ड्यामुळे मानवी जिवनाची नुकसान होण्याची दाट शक्यता निर्मान झाली आहे.या सदरील रस्त्याची अत्यंत बिकट आशी दुरावस्था झाली असून याकडे प्रशासनाचे व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे,या आगोदरही निवेदन व वर्तमान पत्रातुन रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी नागरीकांनी केली होती परंतु याकडे स्पष्ट दुर्लक केले असून लोकांच्या जीवाशी खेळ खेळु नका आशी विनंती प्रशासनाकडे व लोकप्रतिनिधींकडे केली जात आहे.रस्ता दुरुस्ती करण्यात यावा यासाठी वंचित बहुजन आघाडी व रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने वडवणी तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन देण्यात आले.आठ दिवसाच्या आत रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा पंचक्रोशीतील गावकऱ्यांना सोबत घेऊन महात्मा ज्योतिराव फुले चौक वडवणी या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा संघटक विनोद काकडे रिपब्लीकन विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश ऊजगरे वंचित बहुजन आघाडीचे मा तालुका अध्यक्ष चरणराज वाघमारे,रवी काकडे,यांनी तहसिलदार व बांधकाम विभागाला यांना निवेदना द्वारे दिला आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी