बीड शहरात जल वाहतूक सुरू करून प्रशासकांनी युवकांना रोजगार द्यावा - प्रशांत डोरले
विकास पर्वाचे एकाच पावसात निघाले वाभाडे
बीड (प्रतिनिधी) :- बीड नगरपालिकेवर मागच्या चार महिन्यांपासून प्रशासक आहेत. त्यामुळे खन्या अर्थाने अधिकान्यांच्याच हाती सारी सत्ता आहे. पावसाळा सुरु होण्यापूर्वीच नगरपालिकेने मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम हाती घेणे आवश्यक होते. मात्र त्या काळात मुख्याधिकारी असलेले उत्कर्ष गुट्टे यांनी बीड शहरातील नाले सफाई, विकास कामे या पेक्षा राजकीय नेत्यांच्या पुढे मागे करण्यातच धन्यता मानल्याने त्यांच्या अकार्यक्षमतेचे परिणाम आता बीडच्या नागरिकांना भोगावे लागत आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास बीड शहरात तब्बल अर्धातास जोराचा पाऊस आला. शहरातील मान्सून पूर्व सफाईची कामे ही अपूर्णच असल्याने तर काही भागात केलीच गेली नसल्याने पावसाचे पाणी आणि तुबलेल्या गटारातून येणारे दूषित पाण्यातील कचरा व गाळ नागरिकांच्या घरात शिरत असल्याचे चित्र पहायला मिळत होते. विशेष म्हणजे शहराच्या सर्वच भागात हेच चित्र असल्याने नागरिकांची मात्र दाणादान उडाली. त्यामुळे मान्सून पूर्व सफाई नेमकी कोणाच्या फायद्यासाठी व कागदोपत्री बिल उचलण्यासाठी तर केली गेली नाही ना असा आरोप शिवसंग्राम युवक आघाडीचे प्रशांत डोरले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला आहे.
यात म्हंटले आहे की बीड शहरात अर्धातास धो धो पाऊस पडला आणि त्या पावसाने चीड नगरपालिकेच्या विकासाच्या मोठ मोठ्या दाव्यांची पोलखोल केली. शहराच्या प्रभाग क्रमांक ८ मधील बशिरगंज, कतकटपुरा, नवगण राजुरी वेस, बुंदेलपुरा, अशा सर्वच भागांमधील घरांच्या मध्ये गटाराचे आणि पावसाचे गुडघाभर पाणी घुसले असल्याने, यातून रोगराई व आजार डोके वर काढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने बीडचे भुषण म्हणनाऱ्या डॉक्टर साहेबांनी विकासाच्या पर्वाच्या गप्पा सोशल मीडियावर मारण्याऐवजी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले असते तर नागरिकांचे आरोग्य व बीडचे वाभाडे निघाले नसते व बीडच्या विकसनशील नगरपालिकेने मान्सूनपूर्व नेमकी काय स्वच्छता केली आहे असा प्रश्न आता उपस्थित झाला नसता असा ही आरोप यावेळी करण्यात आला आहे.
Comments
Post a Comment