आम आदमी पार्टीच्या आंबेजोगाई तालुका अध्यक्षपदी राम कृष्ण गुंडरे यांची निवड
उपाध्यक्षपदी सोमेश्वर चौधरी, सचिव अमोल शिंदे, संघटन मंत्री गणेश कस्पटे, यांची निवड करण्यात आली.
आंबेजोगाई प्रतिनिधी :-अंबेजोगाई आम आदमी पार्टीच्या वतीने आंबेजोगाई येथे मा. माजी सैनिक अशोक येडे, जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी यांच्या नेतृत्वामध्ये शासकीय विश्राम गृह आंबेजोगाई येथे पार पडली या बैठकीत पदाधिकाऱ्यांना नियुक्त देण्यात आल्या आंबेजोगाई तालुका अध्यक्षपदी राम कृष्ण गुंडरे, तर उपाध्यक्ष सोमेश्वर चौधरी, सचिव अमोल शिंदे, व संघटन मंत्री गणेश कस्पटे सदस्य म्हणून केशव भाई यांची निवड करण्यात आली यावेळी जिल्हा कमिटीचे जिल्हा सचिव रामधनजी जमाने, यांच्या उपस्थितीमध्ये हे पदभार देण्यात आले हे सर्व पदाधिकारी आम आदमी पार्टीचे विचार आम आदमी पार्टीचे ध्येय धोरण व नागरिकांशी नाळ जोडण्याचं काम अंबेजोगाई तालुक्यामध्ये गावागावात पर्यंत मा.अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री दिल्ली सरकार व दिल्लीमध्ये झालेली कामे हे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करतील अशी अपेक्षा बाळगतो व त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा देतो या बैठकीय वेळी उपस्थित अभिषेक शिंदे बिभीषण भोसले सुशिल देशमुख सिद्धेश्वर वैद्य संदीप महाडे नरसिंह देशमुख इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment