फोटोग्राफी क्षेत्रातील कमी वयात आपली वेगळी ओळख निर्माण करणारा युवा फोटोग्राफर . रुद्रा बाबर



बीड प्रतिनिधी अंकुश गवळी

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुद्रा सदाशिव बाबर वय वर्षे 24, गाव, ठा, आडगाव, तालुका गेवराई जिल्हा बीड, येथील रहिवासी रुद्रा बाबर यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठा,आडगाव येथे झाले, माध्यमिक शिक्षण यमादेवी विद्यालय जातेगाव या ठिकाणी झाले, उच्च माध्यमिक शिक्षण मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे बलभीम महाविद्यालय या ठिकाणी चालू आहे, अत्यंत गरीब परिस्थिती या युवकांची, मागील सहा वर्षा पूर्वी बीड शहरातील एका फोटोग्राफी दुकानावर ते कामाला होते, काम करत असताना त्यांच्या मनात आलं की आपण आता फोटोग्राफी व्यवसाय सुरू करावा, फोटोग्राफरची तर दुकान तर टाकायची पैसा भांडवल कुठून आणायचे, हा रुद्रा बाबर यांच्या मनात पडलेला मोठा प्रश्न, त्यांनी काही वर्ष फोटोग्राफी क्षेत्रात काम केले शहरात, मग त्यांनी स्वतःचा व्यवसाय व स्वतःचे दुकान बीड शहरातील सारडा सेंटर डीपी रोड या ठिकाणी आर,बी ,फोटो स्टुडिओ या दुकानाची स्थापना केली गेली दोन वर्ष पूर्वी, खरतर अत्यंत, जिद्द, चिकाटी ,संघर्ष घेऊन युवक फोटोग्राफी क्षेत्रात आपल्या व्यवसायात पदार्पण करत आहे, रुद्रा बाबर हे फोटोग्राफी क्षेत्रात व्यवसाय करत असताना अनेक लोक त्यांना भेटले त्,यांनी माणसं जोडण्याचा प्रयत्न केला, हा रुद्रा बाबर आज फोटोग्राफी क्षेत्रातील कमी वयात जास्त अनुभव असणारा हा युवक चर्चेला जातो, अत्यंत प्रामाणिक पणा हुशार विद्यार्थी अत्यंत संघर्ष घेऊन फोटोग्राफी क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारा युवा फोटोग्राफर रुद्र बाबर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी