शेती व्यवस्थापन निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढणे आवश्यक- मंडळ कृषि अधिकारी खेडकर

कृषी संजीवनी मोहिमेचा मौजे दिमाखवाडी येथे तिसरा दिवस

आज दिनांक 27 जून 2022 रोजी मंडळ कृषि अधिकारी मादळमोही अंतर्गत मौजे दिमाखवाडी येथे कृषि संजीवनी मोहिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री खेडकर एच व्ही मंडळ कृषि अधिकारी मादळमोही हे बोलत होते. दिनांक 25 जून ते 1 जुलै या कालावधीत कृषि विभागार्फत कृषि संजिवनी मोहीम राबविण्यात येणार आहे.या मोहिमेत कृषि विभागाच्या सर्व योजना व तंत्रज्ञान विविध माध्यमातून शेतकऱ्यांपर्यत पोहचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. आज मोहिमेचा तिसरा दिवस होता.आजच्या कार्यक्रमाची थीम महिलांचा शेतीमधील योगदान व सेंद्रिय शेती ही होती.त्या अनुषंगाने श्री खेडकर यांनी महिलांचे शेती मधील योगदान विशद केले तसेच शेती व्यवस्थान निर्णय प्रक्रियेत महिलांनी सहभाग नोंदवला पाहिजे असे मत व्यक्त केले.तसेच या गावात उसाचे क्षेत्र जास्त असल्याने एकात्मिक हुमणी नियंत्रण, एकात्मिक कापूस व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले.तसेच दिमाखवाडी हे गाव जमीन आरोग्य मृद पत्रिका योजनेत आहे त्या अनुषंगाने श्री सांगळे आर व्ही यांनी माती परिक्षण, बीजप्रक्रिया व जैविक खतांचा वापर या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.श्री मोहोळकर यांनी प्रास्ताविकात कृषि संजिवनी सप्ताहाची पार्श्वभूमी विशद केली.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री मोहोळकर बी आर कृषी सहायक यांनी केले तर आभार श्री एम आय शेख यांनी मानले.कार्यक्रमात बाजरी पिकाचे परमिट शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले.कार्यक्रम संपल्यावर श्री सव्वाशे यांच्या शेतात लावलेल्या प्रकाश सापळ्याला भेट दिली.व श्री शेख यांनी हुमणी नियंत्रणात प्रकाश सापळ्याचे महत्व प्रात्यक्षिकासह शेतकऱ्यांना पटवून दिले. या कार्यक्रमाला श्री आर व्ही सांगळे कृषि पर्यवेक्षक, श्री व्ही डी जाधव कृषि पर्यवेक्षक श्री एम आय शेख कृषि सहायक, प्रगतशील शेतकरी श्री तुकाराम सव्वाशे,श्री मोरे, पंडित अलगुडे, चांगु नाईकवाडे, दिनेश मोहिते, संतराम अलगुडे व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळ कृषि अधिकारी मादळमोही अधिनस्त सर्व अधिकारी कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी