ग्रामपंचायत तळेगाव रोही कडून नियोजित बुद्ध विहार जागेवर अतिक्रमण

चांदवड तालुका प्रतिनिधी उस्मान शेख:-   तळेगाव रोही येथील सर्व बौध्द बांधवांनी राजवाडा / बौध्द वाडा गट नंबर १०२० मध्ये सर्व बौध्द बांधव राहत होते, तसेच बौध्द बांधवांनी मागणी केल्याप्रमाणे हया जागेवर बुध्द विहारा करीता २ एकर जागा मिळणे बाबत सन २०१५ मध्ये मागणी करून आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाने आम्हाला हया राजवाडा, बौध्द वाडा येथे पूर्णपणे २ एकर जागा नसल्यामुळे जी जागा हया परिक्षेत्रात आहे ती सर्व जागा बुध्द विहार बांधकाम करण्यासाठी ग्रा.पं तळेगाव रोही मासिक बैठक ठराव क्रमांक.५३/५ दि.२६/१०/२०१५ रोजी संमत करून आम्हाला बुध्द विहारकरिता जागा दिलेली असतानाही, हया राजवाडा,बौद्ध वाडा गट नंबर १०२० मधील परिक्षेत्रात सध्याचे सत्ताधारी राजकीय पुढारी, नेते गावात जातीय, धर्मवाद निर्माण करून मनमानी कारभार पद्धतीने हया राजवाडा,बौद्ध वाडा परिसरात बेकायदेशीर बांधकाम करण्यासाठी तोंडी परवानग्या देऊन गावात जातीय, धर्म वाद तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे...
      आम्ही आपणास पुन्हा एकदा सुचित करतो की, हया राजवाडा , बौद्ध वाडा परिसरात बेकायदेशीर झालेले बांधकाम अतिक्रमण त्वरीत हटविण्यात यावे व हया अतिक्रमणाची आपल्या ग्रामपंचायत ८-अ ला कुठल्याही प्रकारची नोंदणी करू नये. 
   अन्यथा आम्हाला आक्रमक पवित्रा घेण्यास प्रवृत्त करू नये असा ही इशारा निवेदनात लेखी स्वरुपात मांडला आहे. गावातील सामाजिक एकात्मतेस गालबोट लागू नये. ही दक्षता आपण एक शासकिय अधिकारी म्हणून त्वरित कार्यवाही करावी... असे हया निवेदनाद्वारे विविध राजकिय पक्ष, सामाजिक संघटना भारतीय बौध्द महासभा, बुध्द विहार समिती,आर.पी.आय शाखा, वंचित बहुजन आघाडी शाखा, सत्यशोधक शेतकरी कष्टकरी सभा,सिध्दार्थ मित्र मंडळ तळेगांव रोही , सुखदेव सोमा केदारे , भाऊसाहेब धर्मा केदारे, रविंद्र गंगाधर केदारे, वेडूजी दगु केदारे , दिवाकर भिमराव केदारे, एकनाथ काशिनाथ आहिरे ,भाऊसाहेब गोविंद केदारे,सुरेश अर्जुन केदारे आदी सर्व बौध्द बांधवांनी ग्रामविकास अधिकारी सुभाष गवई यांना निवेदन दिले...

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी