पाटोदा ग्रुप ग्रा.प.च्या सरपंच पदी सौ. सविता बोराडे यांची निवड

येवला प्रतिनिधी उस्मान शेख :-पाटोदा ग्रुप ग्रा.प.च्या सरपंच पदी सविता अंकुश बोराडे यांची निवड करण्यात आली. सरपंच प्रताप पाचपुते यांनी आवर्तन पद्धतीनुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सदरच्या रिक्त जागेवर सविता बोराडे यांची निवड शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीत एक गट व प्रहार या पक्षाच्या आघाडीकडून ग्रा प सदस्य
१) रईस देशमुख
२) प्रताप पाचपुते
३) राहुल वरे
४) खंडू पवार
५) संतोष दौंडे
६) अझरुद्दीन पठाण
७) गणेश बैरागी
८) जयश्री बोराडे
९) कौसाबाई जाधव
१०) अलका वाघ
११) सुभद्रा मेंगाणे
१२) मंगलबाई बोलणारे
१३) वैशाली पवार
१४) सविता बोराडे
१५) मोनाली घोरपडे
१६) सुनिता आहेर
आधी ग्रा.प सदस्य यांनी मतदानात भाग घेतला. आणि गुप्त मतदान पद्धतीने करण्यात आली.

कारण ग्रुप ग्रा.प. मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची १२ सदस्य निवडून आणून सत्तेत बसले परंतु सरपंच आवर्तन प्रमाणे सरपंच निवडीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दोन गट झाले एक गट साहेबराव आहेर, अण्णा दौंडे तर दुसरा गट अशोक मेंगाणे, रमेश बोरणारे, प्रताप पाचपुते, मारुतीराव घोरपडे असे घट झाल्याने सरपंच पदाची निवडणूक ही चुरशीची झाली.
या साहेबराव आहेर गटाकडे ग्रा.प ७ सदस्य तर अशोक मेंगाने गटाकडे ५ सदस्य असून काँग्रेसचे ३ सदस्य व शिवसेनाचा १ सदस्य असून त्यात साहेबराव गटाकडे ४ सदस्य अटी व शर्ती मान्य करून राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना प्रहार संपूर्ण पक्ष एकत्र येऊन महा विकास आघाडी करून महाविकास आघाडीचा सरपंच म्हणून सविता बोराडे यांनी ९ मते घेऊन विजयी झाले. व राष्ट्रवादी काँग्रेस गट अशोक मेघाने यांचे सरपंच पदाचे उमेदवार मोनाली कृष्णा घोरपडे यांना ७ मते मिळाले ७ विरुद्ध ९ मते घेऊन सविता बोराडे यांची सरपंच पदी निवड झाली.
या निवडीसाठी साहेबराव आहेर, अण्णा दौंडे, रतन बोरणारे, उस्मानभाई शेख, पुंडलिक पाचपुते, बाळासाहेब पिंपरकर, चांगदेव पिंपरकर, विलास पवार, सोमनाथ भिसे, संपतराव बोरणारे, भीमा पाचपुते, प्रभाकर बोरणारे आदी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेऊन सरपंचपदाचा विजय खेचून आणला....

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी