यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेला मरगळ गती देत अंमलबजावणी करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी
येवला तालुका प्रतिनिधी उस्मान शेख:-महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा वतीने भटक्या विमुक्त जाती जमाती घटकासाठी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत मा. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना सुरू केली असून या योजनेमुळे या घटकातील लोकांची भटकंती थांबून स्थिरता प्राप्त होऊन त्याचे राहणीमान उंचावून आर्थिक प्रगती व्हावी या उद्देशाने राबविण्यात येणारी यशवंतराव चव्हाण घरकुल योजना तात्काळ राबवावी म्हणून वंचित बहुजन आघाडी चा वतीने पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन विचारणा करण्यात आली
केंद्र व राज्य सरकार चा वतीने अनुसूचित जातीच्या घटकांना रमाई घरकुल तर जमातीचा घटकांना शबरीमाता तसेच पंतप्रधान आवास घरकुल योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करून लाभ मिळत आहे तरी भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गातील लोकांचा या घरकुल योजनेला मंजुरी असताना अंबलबजावणी का होत नाही असा सवाल वंचित चा पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला
तालुक्यातील मौजे धुळगाव येथे या योजनेसाठी ग्रामपंचायतीकडून पात्र व गरजू लाभार्थ्यांची निवड करून या घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देत येवला भूमिलेख कडून मोजनी देखील केलेली आहे तरी गेल्या पाच वर्षांपासून हे लाभार्थी घरकुल योजनेचा प्रतीक्षेत असून आपल्या स्तरावरून तात्काळ या योजनेची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री मा. ना .भुजबळ साहेब यांना देखील या योजनेसंदर्भात माहिती दिलेली आहे तरी या योजनेकडे शासन प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने या भटक्या विमुक्ताना या योजनेपासून वंचित राहावे लागत असून यांना वाली कोण ? असा प्रश्न पडला तरी या योजनेची व निवेदनाची दखल घेऊन या योजनेची सखोल चौकशी करून या योजनेचा अहवाल मिळावा व लाभार्थ्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेचा तात्काळ लाभ देण्याची मागणी करण्यात आली सदर प्रसंगी लवकरात लवकर या लोकांना शक्य.त्या योजनेतून प्राधान्याने लक्ष घालून लाभ देऊ असे आश्वासन यावेळी गटविकास अधिकारी अन्सार शेख यांनी यावेळी वंचित आघाडीचा पदाधिकाऱ्यांना दिले यावेळी तालुकाध्यक्ष संजय पगारे,चंद्रकांत साबरे, युवा नेते शशिकांत जगताप, भाऊसाहेब जाधव,दयानंद जाधव युवक जिल्हा उपाधयक्ष ,नानासाहेब पटाईत,कडू पगारे,अनिल पगारे, मुक्तारभाई तांबोळी तालुका उपाध्यक्ष,साहेबराव भालेराव,संजय मिस्त्री,यांच्यासह महिला आघाडीचा सविता धिवर आदी उपस्थित होते
Comments
Post a Comment