वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष किरण वाघमारे यांच्या वर भ्याड हल्ला हल्लेखोरास तात्काळ अटक करा- अशोक हिंगे

. बीड प्रतिनिधी/दि.28 वंचित बहुजन आघाडी चे तालुकाध्यक्ष हे काल आरटीओ ऑफिस मध्ये आपल्या दुकानात काम करत बसले असताना अचानकपणे दोन अज्ञात युवकांनी धारदार शस्त्राने हल्ला चढवला त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्या दोन्ही हातावरती वार आहेत डोक्यावरचा वार त्यांनी हातावर घेतले त्यामध्ये त्यांचा मोबाईल हि फुटला आहे, हल्ला झाल्यानंतर त्यांना तत्काळ त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले, हल्लेखोर अद्यापही मोकाट त्यांना अद्याप अटक झाली नाही याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व पोलीस अधीक्षक कारल्याची अप्पर पोलीस अधीक्षक संतोष वाळके यांचे संपर्क साधून हल्लेखोरांवर तात्काळ कठोर कारवाई करून अटक करावी अशी मागणी केली आहे, आरटीओ ऑफिस कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासून जे दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा अशी मागणी केली आहे, तू फोन का उचलत नाहीस असं म्हणत हल्लेखोरांनी हल्ला चढवला होता, या प्रकाराचा तपास पोलिस करत असल्याची माहिती सांगण्यात आली आहे, किरण वाघमारे हे वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष असून ते सध्या शासकीय रुग्णालय येथे उपचार घेत असून त्यांच्या भेटीसाठी वंचित बहुजन आघाडीचे मराठा अध्यक्ष व शिष्ट मंडळ गेले होते याप्रसंगी आपण पोलीस अधीक्षक संतोष वाळके यांना फोनवरून संबंधित प्रकरणाविषयी चर्चा केली व तात्काळ हल्लेखोर कठोर कारवाई करून शिक्षा करावी अशी मागणी करण्यात आली आहे, किरण वाघमारे यांची प्रकृती सध्या स्थिर असुन त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी