कातरणी येथे मोफत नेत्र चिकित्सा शिबीर संपन्न
बाबासाहेब डमाळे पाटील मित्र मंडळा तर्फे येवला तालुक्यातील कातरणी येथे मोफत नेत्र तपासणी शिबीरआयोजित करण्यात आले होते.याचे उद्घघाटन सरपंच योगेश तांबे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी संगीता संसारी,गोकुळ लोहकरे,विष्णू कदम,सखाराम गायकवाड,
शिवाजीराव पवार,पंढरीनाथआहेर, उषा पवार, शांताराम वैराळ,जालिंदर कासार,भिमाबाई शिंदे,गोपीनाथ नवले,मिनाबाई नवले, हनुमान कुशारे,संदीप मुरकुटे,वृशाल डमाळे यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.
डॉ.राजूखान सय्यद यांच्या माध्यमातून डॉ.अखीलेश रजपुत, डॉ.अजित यादव यांनी यावेळी महिला-पुरुष यांची नेत्र तपासणी केली.नेत्र रुग्णांनाच्या पुणे येथे एच.व्ही.देसाई हॉस्पिटल येथे मोफत शस्त्रक्रिया बाबासाहेब डमाळे पाटील मित्र मंडळा मार्फत करण्यात येणार आहे.अशी माहीती रोहन डमाळे यांनी दिली.
Comments
Post a Comment