डॉक्टर जितीन वंजारे यांनी वारकऱ्यांना दिली मोफत वैद्यकीय सेवा

संत एकनाथ महाराज दिंडीचे रायमोह येथे आगमन.

 डॉक्टर जितीन वंजारे यांनी वारकऱ्यांना दिली मोफत वैद्यकीय सेवा

बीड प्रतिनिधी -महाराष्ट्राला अध्यात्माची खूप जुन्या काळापासून आवड आहे, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, याच महाराष्ट्रात विविध संत-महात्मे, ऋषी-मुनी होऊन गेले त्यांनी महाराष्ट्राला अध्यात्मिकतेच वळण दिलं पारंपारिक ब्राह्मणी वैदिक वेगळी संस्कृती असली तरी शेतकरी, कष्टकरी,दलित,दुबळ्यांचा पंढरीचा 'विठोबा' हाच देव आणि तारणहार मानला जातो. विठुरायाला चंद्रभागेच्या वाळवंटात भेटण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून गाव, वाडी, तांडा आणि पाड्यावरून भोळेभाबडे भाविक भक्त पंढरपूरकडे जात असतात आणि आषाढी एकादशीच्या पावन मुहूर्तावर चंद्रभागा नदीच्या वाळवंटामध्ये हा वैष्णवांचा मेळावा आषाढी एकादशी ला भरला जातो.शेतकऱ्याची पेरणीची कामे सरासरी उरकून वयोवृद्ध, तरुण आणि पोरं-सोर आणि वारकरी परंपरेला जाणारे सर्व लोक अगदी आनंदाने या दिंडीमध्ये सहभागी होतात. संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर, संत गजानन, संत एकनाथ, संत मु्ताबाई अशा विविध संतांच्या आणि महात्म्यांच्या नावाने वेगवेगळ्या पालख्या आणि दिंड्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूर कडे रवाना होत असतात.या दिंड्या वेगवेगळ्या गावांमध्ये मुक्काम दर मुक्काम करून पंढरपूरकडे प्रस्थान करतात. अशिच आज दिनांक 26 जून 2022 रोजी संत एकनाथ महाराज यांची दिंडी रायमोहा येथे आली असता सामाजिक कार्यकर्ते तथा होमीओ पँथिक डॉक्टर संघटनेचे जिल्हा महासचिव डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी आपल्या संजीवनी हॉस्पिटल आणि मेडिकल ट्रस्ट संचलित संजीवनी हॉस्पिटल रायमोह च्या वतीने वारकऱ्यांसाठी आणि भाविक भक्तांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते यामध्ये शेकडो भाविक भक्तांनी शिबिराचा लाभ घेतला.पंढरपूरचा विठोबा तिथे जाऊनच दर्शन घेऊन पावत नसतो तर सेवाभावी जीवन जगले असता तो कुठेही पावन होऊ शकतो असे समाजाप्रती आणि विठुराया प्रति भावना ठेवून सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी सामजिक कार्य केले. हा सकारात्मक विचार ठेऊन ही व अशी सामाजिक कार्य आपण नेहमी करत असतो असेही त्यानी म्हटले. त्यांच्या या अफलातून मोफत सेवेमुळे विविध ठिकाणाहून चालून-चालून थकून-भागून आलेल्या वारकऱ्यांना आरोग्य सेवेमुळे आराम मिळाला आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद उफाळून आला. यावेळी डॉक्टर जितीन वंजारे यांनी कष्टकरी वारकरी आणि हतबल असलेल्यांना आपण केव्हाही मदत करण्यास तयार असल्याचे मत व्यक्त केले आणि वारकऱ्यांना दिलेल्या मोफत सेवेबद्दल मनोमन आनंद असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली .
        रायमोह हे गाव बारा वाड्या एकत्र येऊन जमलेले आहे. परिसरातील मोठे गाव म्हणून या गावाची ओळख आहे. या गावांमध्ये धार्मिक वातावरण असून समाजातील दानशूर लोक आलेल्या दिंडीतील लोकांना अन्नदान करतात.आपापल्यापरीने कोणी कपडे दान करतो,कोणी अन्नदान करतो कोणी पंचपक्वान्न वाटप करतं तर कोणी दिंडीची सेवा म्हणून आपलं घर,अंगण किंवा वाडा वारकऱ्यांना राहण्यासाठी उपलब्ध करून देतात. या काळात दिंडीचे आगमन झाल्यापासून तर दिंडी गावातून जाईपर्यंत अक्षरशा वातावरण धार्मिक आणि वारकरीमय होऊन जाते कारण जिकडे तिकडे वारकऱ्यांच्या टाळ, मृदंग, चीपळी आणि ढोलकीचाचं गजर असतो, हरि नामाच्या गजराने रायमोह नगरी दुमदुमून जाते.या काळात लहान मुले छान छान कपडे घालून पिपाणी वाजवून पालखीतील लोकांचे यथोचित स्वागत करतात आणि मोठी माणसे अन्नदान करून व पालखीतील लोकांची सेवा करून आनंदोत्सव साजरा करतात. या गावाची धार्मिक परंपरा पाहून सामाजिक कार्यकर्ते डॉ.जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी आपल्या संजीवनी मेडिकल ट्रस्ट खालापूरी संचलित संजीवनी हॉस्पिटल रायमोह या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.यात शेकडो वारकरी भाविक भक्तांनी या मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. वारकऱ्यांची सेवा आपण दरवर्षी करतो आणि यापुढेही करत राहील असे मत यावेळी डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी