कला व विज्ञान महाविद्यालय कु-हा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न


श्रीराम शिक्षण संस्था धामणगाव रेल्वे द्वारा संचालित कला व विज्ञान महाविद्यालय कुऱ्हा येथे राष्ट्रीय सेवा योजना व शारीरिक शिक्षण विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय योग दिन घेण्यात आले.
याप्रसंगी अध्यक्ष म्हणून मा.प्राचार्य डॉ अरविंद देशमुख हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री मकरंद जी जोग हे होते.तसेच स्था.विकास समिती सदस्य मा. श्री विजयराव डहाके व मा.श्री किसनरावजी इखार हे होते.
मा. श्री मकरंद जोग यांनी प्रात्यक्षिक करून सर्वांना योग शिकविले व आपले शरीर व मन स्वस्थ ठेवण्याकरिता दररोज योगा करणे किती आवश्यक आहे हे सर्व त्यांनी योग शिकवून, करून दाखविले . शारीरिक स्वास्थ्य चांगलं ठेवण्याकरिता नित्य व्यायाम करणे हे आवश्यक आहे. व्यायामाचे महत्त्व त्यांनी विषद करून सांगितल तसेच एक प्रार्थना ही गायन करून सांगीतली.मा.श्री इखार काका यांनी ही व्यायामाची महत्ता सांगितली. अध्यक्षीय भाषणात मा. प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख सर उद्बोधन करतांना म्हणाले की व्यायामा मुळे न केवल शारिरीक स्वास्थ्य तर मानसिक स्वास्थ्य ही चांगलं राहतं हे आपली दिनचर्या असायला पाहिजे.सुत्रसंचालन श्री रंजन शेंडे यांनी तर आभार व्यक्त श्री गजानन बेहरे यांनी केले.या वेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रवंदना वंदे मातरम या गीताद्वारे झाली.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

नितीन काळे यांचा तलावात बुडून मृत्यू!