गेवराई तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी दिव्यांग सहाय्यता पोर्टलवर नोंदणी करून घ्यावी
गेवराई तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी दिव्यांग सहाय्यता पोर्टलवर नोंदणी करून घ्यावी निराधार अनुदान मिळण्यास होणार मदत, वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष अजय कुमार उर्फ पप्पू गायकवाड यांचे आवाहन गेवराई (प्रतिनिधी ) गेवराई तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी शासनाच्या दिव्यांग सहाय्यता पोर्टलवर आपली नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे गेवराई तालुक्याचे माजी तालुकाध्यक्ष अजय कुमार उर्फ पप्पू गायकवाड यांनी केले आहे. सध्या दिव्यांग सहाय्यता पोर्टल सुरू असून, आपले सेवा केंद्राच्या माध्यमातून नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील पात्र दिव्यांग बांधवांनी आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी पूर्ण करून घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.दिव्यांग बांधवांना निराधार अनुदान मिळण्यास तात्काळ मदत व्हावी आणि अनुदानाच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये, या उद्देशाने पोर्टलवर नोंदणी करणे महत्त्वाचे आहे. अनेक दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळविताना कागदपत्रांची पूर्तता, आधार कार्डची माहिती, बँक खात्याची स्थिती आणि इतर तांत्रिक अडच...