चौसाळा येथे गुरुदेवांची 147 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

चौसाळा येथे गुरुदेवांची 147 वी जन्मजयंती मोठ्या उत्साहात साजरी
(बीड प्रतिनिधी )कर्नाटक गजकेसरी, घोर तपस्वी, परम पूज्य गुरुदेव गणेशलालजी म.सा. यांची 147 वी जन्मजयंती चौसाळा येथे मोठ्या हर्षोल्लासात साजरी करण्यात आली. यानिमित्त गुरुदेवांना कोटी कोटी नमन करण्यात आले.

गुरुदेवांनी सन 1954 मध्ये चौसाळा येथे श्री महावीर गौरक्षण संस्था या नावाने गौशाळेची स्थापना केली होती. आज या संस्थेत 400 गौमातांचे संगोपन सुरू आहे. गुरुदेवांच्या प्रेरणेतूनच गौसेवा, जीवदया आणि धर्माची ही अनुपम साधना अखंड सुरू आहे.

जन्मजयंती कार्यक्रमाची सुरुवात झेंडावंदनाने झाली. लातूरचे प्रतिष्ठित श्रावक श्री शांतिलालजी बलदोटा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गुरुदेव प्रार्थना करण्यात आली. समाजातील सर्व वर्गातील श्रावक-श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी रोशन खिवंसरा गुरुदेवांप्रती आपले विचार व्यक्त केले. गुरुदेवांचे जीवन, त्यांची अहिंसा,तप,एकता, गौसेवा आणि समाजासाठीचे योगदान याचे स्मरण करण्यात आले व राजेश लोढा यांनी प्रसाद व प्रभावणा वाटप केली 

कार्यक्रमाला श्री महावीर गौरक्षण संस्थेचे संपर्क प्रमुख श्री आनंद नहार, ऊमेश लोढा,नितीन लोढा, आनंद लोढा,भुषण खिवंसरा, सुभाष बोरा,अनुप बेदमुथा, संदेश खिवंसरा, मयूर नहार, संतोष लोढा सतिश कोचर, पारस धोका,विनोद धोका व ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी