शिवसेनेतर्फे वाणगाव फाटा येथे दिवाळी शिध्याचे वाटप

शिवसेनेतर्फे वाणगाव फाटा येथे दिवाळी शिध्याचे वाटप!
बीड (प्रतिनिधी) : हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत, शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वतीने पाठविण्यात आलेल्या दिवाळी शिध्याचे चौसाळा जिल्हा परिषद सर्कलमधील वाणगाव फाटा येथील रामहरी महाराज मठ परिसरातील तुकाराम महाराजांच्या मंदिराजवळ ग्रामस्थांना वाटप करण्यात आले.
              शिवसेना जिल्हाप्रमुख मा. अनिलदादा जगताप यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या ग्रामस्थांच्या जीवनात दिवाळीचा आनंद फुलविण्याचा स्तुत्य प्रयत्न करण्यात आला. सणासुदीच्या काळात गरजू ग्रामस्थांना मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
             या कार्यक्रमास शिवसेना संपर्कप्रमुख बीड-धाराशिव ॲड. संगीताताई चव्हाण, तालुकाप्रमुख संतोष जाधव, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सर्फराज काझी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे दीपक काळे, प्रदीप माने सर, जिल्हा संघटक प्रतिभा गणोरकर तसेच महिला आघाडी विधानसभाप्रमुख प्रणिता पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी