शेतकऱ्यांच्या वेदनांची जाणीव असणारे एकनाथ शिंदे हे संवेदनशील नेतृत्व- अनिलदादा जगताप



शेतकऱ्यांच्या वेदनांची जाणीव असणारे एकनाथ शिंदे हे संवेदनशील नेतृत्व- अनिलदादा जगताप

माजलगाव, वडवणी, किल्लेधारूरमध्ये दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना किराणा किटचे वाटप

बीड, प्रतिनिधी : शेतकऱ्यांच्या अडचणी आणि त्यांच्या वेदनांची जाणीव ठेवून संकटकाळात त्यांच्या मदतीसाठी धावून जाणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब हे खऱ्या अर्थाने संवेदनशील नेतृत्व आहे. ते नेहमीच शेतकरी, कष्टकरी आणि गरजू जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांनी केले.

दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या पुढाकारातून माजलगाव, वडवणी आणि किल्लेधारूर येथे दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांनी या उपक्रमाचे नियोजन करून स्वतः उपस्थित राहत शेकडो गरजू शेतकरी कुटुंबांपर्यंत मदत पोहोचवली. यावेळी बोलताना अनिलदादा जगताप म्हणाले की, शेतकऱ्यांवर आलेले संकट हे केवळ एका कुटुंबाचे संकट नसून संपूर्ण समाजासमोरील आव्हान आहे. शेतकरी हा समाजाचा कणा असून त्याच्या कष्टावरच अर्थव्यवस्थेचा डोलारा उभा आहे. त्यामुळे दुष्काळासारख्या कठीण परिस्थितीत शेतकरी कुटुंबांना आधार देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. एकनाथजी शिंदे साहेब यांनी नेहमीच राजकारणापेक्षा माणुसकीला आणि सत्तेपेक्षा जनसेवेला प्राधान्य दिले आहे. सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत गरजूंना मदतीचा हात देण्याची त्यांची भूमिका त्यांच्या संवेदनशील नेतृत्वाची प्रचिती देणारी आहे.

शेतकरी बांधवांनी कोणत्याही परिस्थितीत खचून जाऊ नये. तुमच्या अडचणीच्या काळात एकनाथजी शिंदे साहेब तुमच्या पाठीशी आहेत, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि शिवसेना सदैव तुमच्या सोबत आहे. संकट कितीही मोठे असले तरी शेतकरी बांधवांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. त्यांच्या मदतीसाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जातील, असा विश्वासही अनिलदादा जगताप यांनी यावेळी व्यक्त केला. माजलगाव, वडवणी आणि किल्लेधारूर येथे राबविण्यात आलेल्या या मदत उपक्रमामुळे दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला. अडचणीच्या काळात मिळालेल्या या मदतीचे परिसरातून स्वागत होत असून, या उपक्रमातून शिवसेनेची सामाजिक बांधिलकी आणि शेतकऱ्यांप्रती असलेली संवेदनशीलता पुन्हा एकदा अधोरेखित झाली. याप्रसंगी शिवसेना तसेच अंगीकृत संघटनांचे आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी