ग्राम रोजगार सहाय्यकांच्या उपोषणाला यश! ॲड. संगीताताई चव्हाण यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे
ग्राम रोजगार सहाय्यकांच्या उपोषणाला यश! ॲड. संगीताताई चव्हाण यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे
बीड (प्रतिनिधी) : गेवराई तालुक्यासह बीड जिल्ह्यातील ग्राम रोजगार सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आयोजित एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाची ॲड. संगीताताई चव्हाण यांच्या पुढाकाराने आणि यशस्वी मध्यस्थीने सांगता झाली.
आज उपोषणस्थळी बीड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. काळे साहेब, नरेगा विभागाचे अधिकारी, बीड व गेवराईचे गटविकास अधिकारी श्री. सानप साहेब, ॲड. संगीताताई चव्हाण आणि शकुंतलाताई घुंगासे यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली.
यावेळी ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील अतिरिक्त ग्राम रोजगार सेवक कार्यरत असलेल्या ग्रामपंचायतींची तालुकानिहाय यादी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे ठरले.
यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. काळे साहेब यांनी यादी प्राप्त झाल्यानंतर दहा दिवसांच्या आत हा प्रश्न मार्गी लावण्याचे तसेच प्रलंबित मानधन केवळ मूळ ग्राम रोजगार सहाय्यकांनाच देण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यावेळी ॲड. संगीताताई चव्हाण यांनी स्पष्ट केले की, जिल्हा स्तरावर हा प्रश्न मार्गी न लागल्यास मंत्री श्री. गोगावले साहेब आणि उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून बैठक घेऊन हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले जातील.
त्यांनी दाखवलेली तत्परता, प्रशासनाकडे केलेला पाठपुरावा आणि मध्यस्थी यामुळे ग्राम रोजगार सहाय्यकांच्या प्रश्नाला सकारात्मक दिशा मिळाली आणि उपोषण मागे घेण्यात आले.
Comments
Post a Comment