लिंबागणेश येथे ३०० दुष्काळग्रस्त कुटुंबांना दिवाळी शिधा किटचे वाटप

लिंबागणेश येथे ३०० दुष्काळग्रस्त कुटुंबांना दिवाळी शिधा किटचे वाटप!

शिवसेना जिल्हाप्रमुख स्वप्निल गलधर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक उपक्रम
लिंबागणेश (दि.२०) : बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त कुटुंबांची दिवाळी गोड व्हावी, या उद्देशाने शिवसेनेच्या वतीने बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील लिंबागणेश येथे ३०० कुटुंबांना शिधा किटचे वाटप करण्यात आले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच बीड शिवसेना जिल्हाप्रमुख स्वप्निल भैय्या गलधर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. दुष्काळामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या गरजू कुटुंबांना दिवाळी सण आनंदात साजरा करता यावा, यासाठी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेल्या शिधा किटचे वितरण करण्यात आले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, पत्रकार हरिओम क्षीरसागर, स्व. अमोलभैय्या गलधर युवा मंच लिंबागणेशचे सदस्य संदीप आवसरे, सय्यद अख्तर, अक्षय नाईकवाडे, शिवाजी पवार, बाळकृष्ण थोरात, सुरेश निर्मळ, अरुण निर्मळ, तुकाराम गायकवाड, रुद्रा निर्मळ, महेश ढास, विकास कुदळे, सचिन आगवान, यश काटे, अमोल वक्ते, उमेश थोरात, सूरज कदम यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गरजू कुटुंबांना दिवाळीच्या सणात मदतीचा हात देणाऱ्या या उपक्रमामुळे लाभार्थ्यांना दिलासा मिळाला.

 

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी