बीड पोलीस दलाचा ऐतिहासिक विजय; जनरल चॅम्पियनशिपवर नाव कोरले

२९ वर्षांनंतर बीड पोलीस दलाचा ऐतिहासिक विजय; जनरल चॅम्पियनशिपवर नाव कोरले  

​बीड प्रतिनिधी : १५ ते २१ नोव्हेंबर २०२६ दरम्यान आयोजित ३६ व्या छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा – २०२६ मध्ये बीड पोलीस संघाने सर्वसाधारण विजेतेपद (जनरल चॅम्पियनशिप) पटकावले आहे. सन १९९७ नंतर तब्बल २९ वर्षांनी बीड पोलीस दलाने हा ऐतिहासिक मान मिळवला आहे.  
​या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर शहर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, बीड, धाराशिव आणि जालना या पाच घटकांतील ७०० हून अधिक पोलीस अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला होता. अंतिम गुणतालिकेनुसार बीड पोलीस संघाने पुरुष व महिला गटात मिळून एकूण ३४९ गुणांसह प्रथम क्रमांक मिळवत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. छत्रपती संभाजीनगर शहर संघ ३४० गुणांसह द्वितीय, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण १३४ गुणांसह तृतीय, धाराशिव ८९ गुणांसह चौथा, तर जालना संघ ३१ गुणांसह पाचव्या स्थानावर राहिला.  
​पुरुष गटात बीड पोलीस संघाने २२० गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला, तर महिला गटात छत्रपती संभाजीनगर शहर संघाने १४२ गुणांसह प्रथम आणि बीड पोलीस महिला संघाने १२९ गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला. हॉकी, फुटबॉल, हँडबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, खो-खो, ॲथलेटिक्स, जलतरण, कुस्ती, बॉक्सिंग, ज्युदो, वेटलिफ्टिंग, तायक्वांदो, वु-शु आदी क्रीडा प्रकारांत खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. पुरुष व्हॉलीबॉलच्या अंतिम सामन्यात बीड संघाने छत्रपती संभाजीनगर शहर संघाचा पराभव करत सुवर्णपदकासह विजेतेपद मिळवले.  
​यजमानपद असलेल्या बीड पोलीस दलातर्फे खेळाडूंसाठी क्रीडांगण, निवास, भोजन, पाणी, वाहतूक व विद्युत व्यवस्था उत्तमरीत्या करण्यात आली होती. या ऐतिहासिक यशानिमित्त सर्व विजेत्या खेळाडूंचे, प्रशिक्षकांचे, व्यवस्थापकांचे आणि आयोजकांचे बीड पोलीस दलातर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी