कंकालेश्वर येथे महाशिवांना कार्तिक पर्वातील दीपोत्सव सोहळा अर्पण तथा संपन्न
कंकालेश्वर येथे महाशिवांना कार्तिक पर्वातील दीपोत्सव सोहळा अर्पण तथा संपन्न
कार्तिक पर्वा निमित्त महादेवांना कंकालेश्वर येथे सातत्याने दोन दिवस दिवे लावण्यात आले..
बीड प्रतिनिधी :
एक दिवा ज्ञानाचा, एक दिवा भक्तीचा,
एक दिवा प्रगतीचा
उजळवू सारे विश्व शिवतेजाने शिव कृपेने, अशी प्रेरणा घेऊन बीड शहर बचाव मंचाचे अध्यक्ष श्री नितिनजी जायभाये यांच्या तसेच मित्र, बांधव, भगिनींच्या वतीने शहरातील अनेक प्रतिष्ठित मान्यवरांना तसेच भक्त भाविकांना, विविध सामाजिक संघटनेंच्या सामाजिक कार्यातून सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि खऱ्या अर्थाने मानवीय जीवनाची मूल्य सातत्याने जपवणूक करणाऱ्यां बांधवांना भगिनींना सोबत घेऊन बीड जिल्ह्याचे ऐतिहासिक व आध्यात्मिक वैभव असलेले अनादि,आराध्य दैवत श्री महाशिव महादेव यांना कंकालेश्वर मंदिर येथे अध्यात्मिक दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या कार्तिक पर्वातील दीपावली पाडव्यानिमित्त सातत्याने दोन दिवस संध्याकाळी सामूहिक रीतीने दीप प्रज्वलानाचा व दीप अर्पणाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. यावेळी शहरातील असंख्य भक्त भाविकांच्या सह सामाजिक कार्यकर्त्यांनी दिवे लावण्याचा कार्यक्रम केला. अशा पद्धतीने दिवे लावून सामाजिक एकोपा जपत आध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे शुभ कार्य करण्यात आले. यावेळी नितिन जी जायभाये यांच्यासह कंकालेश्वर देवस्थानचे संजय गुरव आणि समस्त परिवार, गुरु आनंद प्रतिष्ठानच्या सीमाताई ओस्तवाल, पत्रकार तथा सूत्रसंचालिका आरतीताई परळकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख अमोलजी अंकुटे , संतोष भाऊ हरणमारे, विजय काका बुरांडे , रेणुकाताई डांगे, प्रकाश गाढे, संपादक सदाशिव पवळ, दिनेशदादा मोंढेकर, पत्रकार किशोर कुलकर्णी, कृष्णाभाऊ सुरवसे, रुपेश भैय्या बुंदेले, श्यामराव मार्कंडे सर, संस्कार भारतीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत सौंदतीकर, उद्योजक विपिन देशपांडे, पत्रकार तथा संपादक वैभवजी स्वामी, शीलाताई मुंडे, अभिजीत वैद्य, राजू वंजारे, राणीताई गुलरूख जहीन शेख, शिवसंग्राम चे हरिशचंद्र ठोसर, संभाजी महाराज गुरव परिवार, प्रशांतभाऊ बोंदार्डे आणि परिवार, डॉक्टर संजय तांदळे, बाजीराव ढाकणे, बाळासाहेब नागरगोजे यांच्यासह आदी शहरातील असंख्य भक्तजण परिवार या दीपोत्सवात सहभागी होता. या दीपोत्सव शुभ प्रसंगाचे औचित्य साधत दिग्दर्शक अमोल अंकुटे यांनी त्यांच्या नवीन अल्बम च्या गीतांचे सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रथम प्रदर्शन केले.
Comments
Post a Comment