बीडच्या तीन खेळाडूंचा समावेश असणाऱ्या भारतीय संघाची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक
बीडच्या तीन खेळाडूंचा समावेश असणाऱ्या भारतीय संघाची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक!
शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात खेळाडू व प्रशिक्षकांचा अनिलदादा जगताप यांच्या हस्ते सन्मान
बीड (प्रतिनिधी) : भुवनेश्वर (ओडिशा) येथे आयोजित २० वर्षांखालील आंतरराष्ट्रीय महिला रग्बी स्पर्धेत भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. या स्पर्धेत आठ देशांच्या महिला संघांनी सहभाग नोंदवला होता.
विशेष म्हणजे, कांस्यपदक विजेत्या भारतीय संघात बीड जिल्ह्यातील मोरया क्रीडा मंडळाच्या तीन खेळाडूंचा समावेश होता. कु. कीर्ती जाधव, आदिती लोंढे आणि दिपाली ताठे या खेळाडूंनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत देशाच्या यशात मोलाचे योगदान दिले.
या खेळाडूंना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य प्रशिक्षक श्री. नितीन येळके आणि श्री. शोएब खाटीक यांनी केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व खेळाडू आणि प्रशिक्षकांचा शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, बीड येथे शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी शिवसेना महिला संपर्क प्रमुख बीड धाराशिव ॲड. संगीता चव्हाण, किसन सेनेचे बापूसाहेब जाधव आणि तालुका प्रमुख प्रणिता पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
बीड जिल्ह्यातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करून कांस्यपदक मिळविल्याने जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राची मान उंचावली आहे. या यशाबद्दल सर्व खेळाडू आणि प्रशिक्षकांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment