अँबीका चौकातील किरणा दुकानात घरफोदी करणाऱ्या चोरावर शिवाजीनगर पोलिसांची कारवाई; तीन मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड
अँबीका चौकातील किरणा दुकानात घरफोदी करणाऱ्या चोरावर शिवाजीनगर पोलिसांची कारवाई; तीन मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड
बीड (प्रतिनिधी) :
बीड शहरातील अंबीका चौक परिसरातील एका किराणा दुकानाचे शटरचे कुलूप तोडून रोख रक्कम व साहित्य चोरणाऱ्या सराईत चोरास शिवाजीनगर पोलिसांनी तात्ंत्रिक तपासाच्या आधारे जेरबंद केले आहे. ओम महेश गायकवाड (वय २३ वर्षे, रा. माऊली नगर, अंबीका चौक, पांगरी रोड, बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी चैतन्य सखाराम हरकुडे यांचे अंबीका चौक येथे 'ज्ञानेश्वर किराणा स्टोअर्स' नावाचे दुकान आहे. दि. १४/११/२०२६ रोजी रात्री १०:०० ते दि. १५/११/२०२६ रोजी सकाळी ०८:०० वाजे दरम्यान अज्ञात चोराने दुकानाचे लोखंडी शटरचे कुलूप तोडून काउंटरमधील ५,०००/- रुपये रोख रक्कम चोरून नेली होती.
गुन्ह्याचा तपास करत असताना शिवाजीनगर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली. फिर्यादीने फुटेजमधील संशयित इसमाची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी ओम महेश गायकवाड याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने किराणा दुकानातील चोरीची कबुली दिली असून, त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली होंडा युनिक्रॉन मोटारसायकल (क्र. MH 25 AV 7566) जप्त करण्यात आली आहे.
तसेच, आरोपीने त्याच्या साथीदारांच्या मदतीने धाराशिव जिल्ह्यातून तीन मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली असून, त्यावरून धाराशिवमधील आनंदनगर व येरमाळा पोलीस ठाण्यात दाखल असलेले मोटारसायकल चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. पुढील तपासासाठी आरोपीस न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉँवत, अपर पोलीस अधीक्षक श्री. शेखर व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. शितलकुमार बल्लाळ, पोउपनि रवी आघाव, दिलीप राठोड, शुभम सोनवणे, अनिल घटमल व अशोक राडकर यांनी केली आहे.
Comments
Post a Comment