जिल्हा परिषद शाळांच्या स्वच्छतेसाठी सीईओ जितिन रहेमान यांचे कठोर निर्देश
जिल्हा परिषद शाळांच्या स्वच्छतेसाठी सीईओ जितिन रहेमान यांचे कठोर निर्देश जिल्हा परिषद कार्यालयातील “शौचालय स्वच्छता” गांधीगिरी आंदोलनास यश :- डॉ. गणेश ढवळे बीड :- (दि. ३१) बीड जिल्हा परिषद अंतर्गत दि. १९ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२५ दरम्यान राबविण्यात आलेली “हमारा शौचालय, हमारा भविष्य” ही मोहीम केवळ कागदोपत्रीच राबविण्यात आल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी सहकाऱ्यांसह गांधीगिरी आंदोलन केले. दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाड्यांमध्ये अनेक ठिकाणी शौचालयांचा अभाव असून, काही ठिकाणी उपलब्ध शौचालये वापरण्यायोग्य नसल्याने विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांची शारीरिक व मानसिक कुचंबणा होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद मुख्य इमारतीतील सीईओ यांच्या केबिनसमोरील पुरुष शौचालयाची स्वच्छता करून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत सीईओ जितिन रहेमान यांनी जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व प्राथ...