के के वाघ क्रिकेट संघ राज्यस्तरावर 'द्वितीय'.
कसबे सुकेणे -नाशिक येथील नमो गार्डन येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय १९ वर्ष वयोगटातील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत के के वाघ विद्याभवन व ज्युनिअर कॉलेज भाऊसाहेब नगरच्या १९ वर्षीय संघाने द्वितीय क्रमांक मिळवून सिल्व्हर गोल्ड मिळविले.त्याबद्दल
संघनायक ओम पाटील,वैभव बोरसे,वेदांत गवारे,क्षितिज पवार,राज आहेर,किरण माळी,विशाल गोयेकर,ऋषिकेश गोयेकर,आदित्य वाघ,संकेत फापाळे वेदांत सोनवणे,सिद्धेश खैरे,संकेत रोटे आदी खेळाडूंना सिव्हर मेडल प्रदान करून तसेच क्रीडामार्गदर्शक धनंजय मोरे क्रीडाप्रमुख गोविंद कांदळकर यांचे अभिनंदन करून यथोचित सन्मान प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून करण्यात आला.प्रसंगी के के वाघ शिक्षण संस्थेच्या विश्वस्त शकुंतलाताई वाघ,जनसंपर्क प्रमुख अजिंक्य वाघ,अधीक्षक श्रीकांत ढवळे,शा.व्य.स.अध्यक्ष शिवाजी नाठे,समन्वयक यशवंत ढगे,प्राचार्य दिवाकर शेजवळ,मुख्याध्यापिका उज्वला तासकर,प्राचार्य बाळासाहेब मोंढे उपमुख्याध्यापिका सुनीता वडघुले,डॉ राहुल घायाळ,बस्तीराम रानडे,आर डी गांगुर्डे, प्रवीण रणदिवे,संजय धनगर,उपस्थित जेष्ठ नागरिक संतु जाधव परिसरातील पालक आदींनी उपस्थित होते.
Comments
Post a Comment