मुख्याधिकारी साहेब, गरिबांच्या गाड्यावर हातोडा ; श्रीमंतांच्या अनधिकृत बांधकामांना अभय

मुख्याधिकारी साहेब, गरिबांच्या गाड्यावर हातोडा ; श्रीमंतांच्या अनधिकृत बांधकामांना अभय 

ओपन स्पेस, गार्डन गायब ; तीन मजले इमारतीचे परवानगी असताना बीड शहरात सात मजली इमारती कशा ?
तात्काळ दखल घ्या, नसता नगरपालिकेसमोर आंदोलन 
मनसे राज्य उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे यांचा मुख्याधिकाऱ्यांना इशारा !
बीड (प्रतिनिधी) बीड नगरपालिकेत मागील सात वर्षापासून प्रशासन राज होते, नगरपालिका निवडणूक पार पडल्यानंतर या ठिकाणी आता लोकप्रतिनिधी शहराच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहेत. मात्र प्रशासकीय राज असताना अधिकाऱ्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली होती का ? बीड शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झालेली आहेत, लोकांनी रस्त्यावरच अतिक्रमण करत बांधकामे केली असून शहरातील विविध भागात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी चहा वडापाव व इतर खाद्यपदार्थांची गाडी लावणाऱ्या गरीब लोकांवर मुख्याधिकारी कारवाई करत स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत, बीड शहरात मोठ्या प्रमाणात ओपन स्पेस गायब आहेत गार्डन नावालाच तर लहान मुलांच्या खेळण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने नाईलाजाने क्रीडांगणावर लहान लेकरांना जावे लागते, बीड शहरातील अनेक भागात नियमाच्या पलीकडे जाऊन सात मजली इमारतीचे बांधकाम झालेले आहेत, हे सर्व कोणाच्या आशीर्वादाने ? शरद वाढलेली बांधकामे ही विना परवाना असून रस्त्यावर अतिक्रमण करत अवैध बांधकाम करणाऱ्या वर नगरपालिकेचा हातोडा कधी पडणार , मुख्याधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगरपालिका समोर मोठे आंदोलन उभे करणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला राज्य उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे यांनी म्हटले आहे. 
बीड नगरपालिकेत सत्ता स्थापन होत लोकप्रतिनिधी कामाला लागले आहेत, यापूर्वी प्रशासकीय राज असल्याने मन वाटेल तसे नियम येथील मुख्याधिकाऱ्यांनी केले, अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी लोकप्रतिनिधी नगरपालिकेत असताना मुख्याधिकारी यांनी शहरातील विविध भागात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी छोटेसे चहाच्या गाड्यावरून व्यवसाय करत असलेल्यांना त्रास देणे सुरू केले आहे, अतिक्रमणाची कारवाई करताना सर्वांना समान नियम आवश्यक आहे, गरिबांना एक तर श्रीमंत आणि दसरा नियम नगरपालिकेकडून राबवला जात आहे. नगरपालिकेच्या हद्दीत असणाऱ्या ओपन स्पेस च्या जागा गायब आहेत तर गार्डन नावालाच शिल्लक असून लहान मुलांसाठी खेळणी घर व गार्डन कुठे आहेत. या शहरात व्यवसायिकांनी सर्व नियम धाब्यावर बसवत नगरपालिका नियमानुसार तीन मजली इमारतीपेक्षा मोठ्या इमारती बांधकाम केले आहेत, याकडे कोण लक्ष देणार . मुख्याधिकारी साहेब फक्त गरिबांचे गाडी दिसतात श्रीमंतांची घरे दिसत नाहीत का? जी रस्त्यावर अतिक्रमण करत बांधलेली आहेत. बीड नगरपालिका फक्त राजकारणाची हाताची बाहुली बनली आहे का ? अतिक्रमण विरोधात कारवाई करताना जे नियमबाह्य झालेले आहेत अशा सरोवर कारवाई करावी नसता महाराष्ट्र निर्माण सेनेला नगरपालिकेच्या विरोधात रस्त्याची लढाई लढाई लागणार. असा इशारा प्रसिद्धी पत्रकातून महाराष्ट्र निर्माण सेनेच्या राज्य उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे यांनी दिला आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी