वडगाव ढोक येथे श्री शाहीर मोहन आविळे व त्यांच्या पत्नी यांचा गावकऱ्यावतीने सत्कार व होलार समाज दिनदर्शिकाचे प्रकाशन संपन्न
गेवराई (१९) वडगाव ढोक तालुका गेवराई येथील प्रसिद्ध विद्रोही शाहीर श्री मोहन आविळे व त्यांच्या पत्नी या दांपत्याचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला व होल्हार समाज दिनदर्शिका प्रकाशन गावकरी मंडळांच्या वतीने करण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की प्रथम थोर स्वातंत्र्य सैनिक विदा आविळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वडगाव ढोक येथील विद्रोही शाहीर यांनी ठाणे येथे पार पडलेल्या होलार समाज मेळाव्यामध्ये बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले श्री शाहीर मोहन आविळे व त्यांच्या विविध पत्नी यांनी ठाणे येथे संपन्न झालेल्या होलार समाज मेळ्यामध्ये बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करून आपल्या जिल्ह्याचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवला अशा या शाहिरांचा सत्कार वडगाव ढोक गावकरी मंडळींच्या वतीने आज करण्यात आला व होलार समाज दिनदर्शकेचे प्रकाशन ही गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी चळवळीमध्ये काम करणारे गावातील युवक गावकरी मंडळी महिला समाजवाद मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment