प्रामार्थ केल्याने सुख,समाधान प्राप्त होते.मा.आ.केशवराव आंधळे.
प्रामार्थ केल्याने सुख,समाधान प्राप्त होते.मा.आ.केशवराव आंधळे.
येवता :प्रतिनिधी:आप्पाराव सारूक दि.१९ रोजी केज तालुक्यातील जीवाची वाडी येथे प्रथमच
जीवाची वाडी -पंढरपुर पायी दिंडी सोहळा प्रारंभ सुरू करण्यात आला,प्रमुख पाहुने म्हणुन माजी आमदार श्री. केशवराव(दादा)आंधळे म्हणाले की यावर्षी प्रथमच जीवाची वाडी ते पंढरपुर पायी दिंडी सोहळा सुरू होत आहे.मनुष्याने प्रामार्थ केला तर खरोखरच सुख आणि समाधान मिळते.स्वातंत्र्य सैनिक कै.भगवान काळे यांच्या आत्म्यास खरोखरच शांती लाभेल असे धार्मिक उलखनीय कार्य त्यांचे तिन्ही चिरंजीव पद्माकर,आण्णासाहेब व नामदेव यांनी केले आहे.लागलीच ह.भ.प.श्री.जालींदर महाराज नेहरकर यांचे किर्तनाचे आयोजन केलेले असुन या सुवर्ण संधीचा भावीकांनी लाभ घेण्याचे आव्हान केले,काळे कुटूंब व ग्रामस्थांनी आमदार आंधळे साहेबांचा हृदय सत्कार करून त्यांचे आभार मानले.
Comments
Post a Comment