३५ हजार फूट उंचीवर जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश नाठे यांचा अनोखा वाढदिवस; एअर इंडियाने दिला अविस्मरणीय अनुभव
नाशिक : आकाशात ढगांच्या वर, तब्बल ३५,००० फूट उंचीवर जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश नाठे यांचा वाढदिवस अत्यंत अनोख्या आणि रोमांचक पद्धतीने साजरा करण्यात आला. ग्राहकांना नेहमीच खास आणि अविस्मरणीय क्षण देण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या एअर इंडियाने यावेळीही आपल्या वेगळेपणाची प्रचिती दिली.
आपण अनेक ठिकाणी वाढदिवस साजरे केले असतील, मात्र आकाशात, ढगांच्या वर, थंडगार वातावरणात हवाई सुंदरींसोबत वाढदिवस साजरा होणे हे खरोखरच स्वप्नवत अनुभव असतो. असे स्वप्नातील क्षण प्रत्यक्षात अनुभवण्याची संधी नाशिकमधील युवा नेतृत्व डॉ. रुपेश नाठे यांना मिळाली.
या विशेष प्रसंगी हवाई सुंदरींनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेले एअर इंडियाचे अभिनंदन पत्र डॉ. नाठे यांना सादर केले. “तुमचा वाढदिवस अविस्मरणीय ठरो आणि येणारे वर्ष सुख-समृद्धीचे जावो,” अशा मनःपूर्वक शुभेच्छा या पत्रातून देण्यात आल्या.
याशिवाय, डॉ. नाठे यांच्यासाठी विशेष शुगर-फ्री केक आणि फ्रूट ज्यूसचे आयोजन करण्यात आले. ३५,००० फूट उंचीवरच एक आगळीवेगळी ‘आकाशातील पार्टी’ रचण्यात आली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
या संपूर्ण आयोजनाचे श्रेय हवाई सुंदरी मनप्रीत कौर, ओनीक्स सिना आणि अनुद हसवानी यांना जाते. या सगळ्या क्षणांनी भारावून गेलेल्या डॉ. रुपेश नाठे यांनी एअर इंडियाच्या संपूर्ण क्रू मेंबर्सचे मनापासून आभार मानले आणि हा वाढदिवस आयुष्यभर लक्षात राहील, अशी भावना व्यक्त केली..
Comments
Post a Comment