कुठंनही घुसा पण मुंबईत दिसा.धनगर समाजाचे नेते दिपकभाऊ बो-हाडे यांच्या आवाहनाला लिंबागणेश पंचक्रोशीतील बांधवांचा प्रतिसाद
लिंबागणेश:- ( दि.२० ) धनगर समाजाला अनुसूचित जमाती ( एसटी) प्रवरगाबरोबर नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्यावे या न्याय मागणी गेल्या कित्येक दशकांपासून धनगर समाज बांधव करत आहेत.ईतर राज्यात धनगर समाजाला एसटी आरक्षणाचा लाभ देण्यात येतो मात्र महाराष्ट्र राज्यात धनगड आणि धनगर एकच असताना सरकारने आश्वासन देऊनही पाळले नाही.आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला असुन धनगर समाजाचे नेते दिपकभाऊ बो-हाडे यांनी आज दि.२० मंगळवार रोजी मुंबई येथे ऊद्या दि.२१ रोजी पासुन आझाद मैदान मुंबई येथे सुरू होणा-या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत दाखल व्हावे असे आवाहन केले असुन या आवाहनाला प्रतिसाद देत बीड तालुक्यातील बालाघाटावरील लिंबागणेश पंचक्रोशीतील धनगर बांधवांनी कोणत्याही वाहनाने आणि कोणत्याही मार्गाने मुंबईत दाखल होण्याचा ठाम निर्धार केला आहे. यावेळी "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो" मल्हारराव होळकरांचा विजय असो ""दिपकभाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है " मल्हार बोलो मुंबई चलो " कुठुनही घुसा पण मुंबईत दिसा" अशी घोषणाबाजी करण्यात आली यावेळी कृष्णा पितळे, अमोल पितळे,बंडु ढगारे, अर्जुन पितळे,महावीर गिरे, अमोल गिरे, रामदास मुळे, संदिप मुळे,श्याम गिरे,बंकट लगास,दिपक गिरे,लहु गिरे, प्रमोद गिरे,शुभम कोकाटे, रोहीत तागड,आबा राहिंज, सर्जेराव मुळे, धनंजय मुळे,दिलीप तागड,आदी धनगर समाज बांधव उपस्थित होते.
धनगर समाजाच्या न्याय मागण्यासाठी मराठा बांधव पाठीशी :- डॉ.गणेश ढवळे
धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या न्याय मागणीसाठी आंदोलन करणारे धनगर समाजाचे नेते दिपकभाऊ बो-हाडे यांना अटक करुन लोकशाही मार्गाने सुरू असलेले आंदोलन चिरडण्याचा सरकारचा प्रयत्न निषेधार्थ असुन न्यायालयाने सुद्धा लांबची २८ तारीख देत धनगर समाज बांधवांची क्रुर चेष्टा केली आहे. त्यामुळे संतप्त दिपकभाऊ यांनी आज दुपारी मुंबईच्या दिशेने कुच केले असून धनगर समाज बांधव पाठिंबा देण्यासाठी मुंबईकडे रवाना होणार असून मराठा आरक्षण लढ्यात हातातहात घालून साथ दिलेल्या धनगर बांधवांच्या पाठीशी मराठा बांधव ताकदीने उभा राहणार असुन त्यांना आंदोलन दरम्यान सर्वतोपरी सहकार्य आणि मदत देण्याची भावना मराठा बांधवांची असल्याचे डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी व्यक्त केली.
Comments
Post a Comment