बीडच्या विकासाला गती देणाऱ्या विकासपुरुष लोकनेते अजितदादांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन कट्यावर आंदोलनकर्त्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली



बीड :- (दि. ३०)महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले. पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याशी त्यांचे अतूट नाते निर्माण झाले होते. बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात त्यांनी विकासाची नवी आशा जागवली होती.

पालकमंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळात बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी रेल्वे, विमानतळ, ट्रिपल आयटी (III-T), सहकार भवन, जिल्हा क्रीडा संकुल, सिल्क पार्क, रुग्णालयांसाठी नवीन इमारती व अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्ती व बांधकाम, अंगणवाड्यांसाठी निधी, स्मशानभूमी विकास, ग्रामीण रस्त्यांचे मजबुतीकरण व दुरुस्ती, नर्सिंग कॉलेज, वसतिगृहे, फसवणूक झालेल्या ठेवीदारांसाठी मदत, कंकालेश्वर मंदिर, नाट्यगृह आदींसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला होता.

त्यांच्या या विकासकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आज दि. ३० (शुक्रवार) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनस्थळी आंदोलनकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणप्रेमी आणि अजितदादांवर प्रेम करणाऱ्या बीडकरांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर), माहिती अधिकार कार्यकर्ते शेख युनुस, सुदाम तांदळे, शिवशर्मा शेलार, रामनाथ खोड, बाळासाहेब मोरे पाटील (प्रदेशाध्यक्ष – शिवशक्ती भीमशक्ती विचारमंच), माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष – आम आदमी पार्टी), रामधन जमाले (जिल्हाध्यक्ष – इंटक), सय्यद सादेक (शहराध्यक्ष – आम आदमी पार्टी), प्राचार्य डी. जी. तांदळे (जिल्हाध्यक्ष – महाराष्ट्र राज्य किसान सभा, बीड), राजकुमार कदम (सरचिटणीस – मराठवाडा शिक्षक संघ), धनंजय सानप (जिल्हाध्यक्ष – महाराष्ट्र आश्रम शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना), संजय भालशंकर, भाई गौतम आगळे (नेते – रोजंदारी मजूर सेना), शेतकरी हक्क मोर्चाचे सुहास जायभाये, माईकल अशोक वाघमारे, संभाजी कदम लोणीकर आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

अजितदादांनी केलेली विविध विकासकामे बीडकरांच्या मनात कायमस्वरूपी स्मरणात राहतील, असे यावेळी सांगण्यात आले.



Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी