विदर्भातील तरुणांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठे, शिष्यवृत्ती आणि आधुनिक करिअर यावर एक दिवसीय कार्यशाळेतून मार्गदर्शन
बीड प्रतिनिधी, अंकुश गवळी
तांडा फाउंडेशन आणि वसंतराव नाईक अध्ययन मंडळ, वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था, नागपूर यांचा संयुक्त उपक्रम
बदलत्या काळात सामाजिक शास्त्र शाखेतील उच्च शिक्षण, संशोधन आणि सामाजिक क्षेत्रातील करिअरच्या संधी मोठ्या प्रमाणावर विस्तारत आहेत. या संधींची योग्य माहिती, मार्गदर्शन आणि दिशा मिळावी या उद्देशाने ही एक दिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात करण्यात आली होती. रविवारी पार पडलेल्या या कार्यशाळेत देशातील तसेच परदेशातील नामांकित विद्यापीठे, प्रवेश प्रक्रिया, फेलोशिप्स आणि सामाजिक विकास क्षेत्रातील विविध करिअर मार्गांविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले यामध्ये 115 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कायशाळेत तज्ञ मार्गदर्शक म्हणून तांडा फाउंडेशन चे संचालक प्रशांत चव्हाण, युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्स आणि चेवनिंग स्कॉलर असलेले आकाश नवघरे, फाउंडेशन फॉर इकॉलॉजिकल सेक्युरिटी चे आदिनाथ जाधव, शिव नाडर यूनिवर्सिटी दिल्ली एनसीआर च्या हिमांशी भालाधरे, अझीम प्रेमजी फाउंडेशन चे रोशन जाधव, महिंद्रा विद्यापीठ हैदराबाद च्या वैष्णवी जाधव, तांडा फाउंडेशन चे शिक्षक अमित लांजेवार आणि महाराष्ट्र इंस्टिट्यूट ऑफ लेबर स्टडी चे सुशील जाधव यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उद्घाटन वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्थेचे संचालक डॉ मनोहर कुंभारे यांनी केले. तसेच संस्थेचे संस्कृत विभाग प्रमुख डॉ. अरुण पवार आणि वसंतराव नाईक अध्ययन मंडळाचे अध्यक्ष डॉ. गोविंद राठोड यांनीही मार्गदर्शन केले.
Comments
Post a Comment