बिदुसरा धरणाच्या परिसरात घाणीचे साम्राज्य !परिसरातील अस्वच्छतेमुळे पर्यटकांची नाराजी
बिदुसरा धरणाच्या परिसरात घाणीचे साम्राज्य !परिसरातील अस्वच्छतेमुळे पर्यटकांची नाराजी
जलसंपदा विभागाचे दुर्लक्ष; तात्काळ स्वच्छता न राबविलास जलसंपदा कार्यालयासमोर आंदोलन !
मनसेच्या राज्य उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे यांचा इशारा
बीड( प्रतिनिधी) बीड शहराला मागील अनेक दशकापासून पाणीपुरवठा करणारे पाली गावाजवळी बिंदुसरा धरण हे राष्ट्रीय महामार्गावर असल्याने या ठिकाणाहून प्रवास करणारे अनेक प्रवासी व बीड शहरातील पर्यटन प्रेमी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पिकनिक करण्यासाठी व धरण पाहणसाठी येतात. या धरण परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून, पाली धरणाची देखभाल दुरुस्ती व स्वच्छतेची जबाबदारी असणारे जलसंपदा विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत असून येणाऱ्या पर्यटकांना मात्र धरणातील शुद्ध पाणी पाहण्याऐवजी घाणीचे दर्शन होत आहे. या गंभीर बाबीकडे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यास जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर मनसेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या राज्य उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे यांनी दिला आहे.
पाली गावाजवळ सोलापूर बीड राष्ट्रीय महामार्गावर बीड शहराला गेल्या अनेक दशकापासून पिण्याचे पाणी पुरवणारे बिंदुसरा धरण घाणीच्या विळख्यात सापडले आहे. परिसरात सर्वत्र धरण किनाऱ्यावर घाण पसरली असून याची स्वच्छतेची जबाबदारी असणारे जलसंपदा व विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे, धरण दुरुस्ती व देखभाल साठी महाराष्ट्र शासन विशेष निधीची तरतूद करत आहेत, मात्र या निधीची वाट येथील अधिकारीच लावत आहेत, बीड शहरातून व इतर जिल्ह्यातून पाली येथील बिंदूसरा धरण पाण्यासाठी या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी नागरिक येतात, परिसरातील घाण पाहून पर्यटक आपले नाक मुरडत असून या घाणीला साफ करण्याची जबाबदारी व स्वच्छता राबवण्याची जिम्मेदारी येथील जलसंपदा विभागावर असून याकडे जलसंपदा विभाग मात्र साफ दुर्लक्ष करत आहेत, तात्काळ बिंदुसरा धरणाच्या किनाऱ्यावरील घाण्याची विल्हेवाट न लावल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर घंटा बजाव अधिकारी जगाव आंदोलन करण्यात येणार असल्याचा गंभीर इशारा मनसेच्या राज्य उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे यांनी दिला आहे.
Comments
Post a Comment