पाचोरा पोलिसांची तत्पर कारवाई; अवघ्या १२ तासांत मोबाईल चोरीचा छडा, आरोपी जेरबंद



 यूसूफ पठाण प्रतिनिधी 

पाचोरा शहरात मोबाईल चोरीची घटना घडल्यानंतर अवघ्या १२ तासांत आरोपीचा शोध घेऊन चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पाचोरा पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शोध पथकाच्या जलद व अचूक तपासामुळे आरोपीस अटक करून त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
दि. १८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ५.२५ वाजता, फिर्यादी किशोर आनंदराव नेरकर (वय ३१, व्यवसाय – स्वीट व कोल्ड्रिंक्स विक्री, रा. कुंभारपुरी, पाचोरा) हे आपल्या चारचाकी वाहनात मोबाईल चार्जिंगसाठी ठेवलेला असताना अज्ञात चोरट्याने संधी साधून मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. २९/२०२६, भा.दं.वि. कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित इसमाची ओळख पटवण्यात आली. पोलिसांनी सौरभ नाना भिल (वय २३, रा. कळमसरे, ता. पाचोरा) यास ताब्यात घेऊन विश्वासात घेतल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
तपासादरम्यान आरोपीकडून
₹१५,०००/- किमतीचा शाओमी कंपनीचा अँड्रॉईड मोबाईल (IMEI No. 8671790518504878)
₹१५,०००/- किमतीचा Vivo Y27 Pro मोबाईल
असा एकूण ₹३०,०००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
आरोपीस अटक करून १२ तासांच्या आत मा. पाचोरा न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोहेकॉ/६२३ राहुल काशिनाथ शिंपी करीत आहेत.
ही उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. महेश रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच
पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोहेकॉ/६२३ राहुल शिंपी, पोहेकॉ/३८५ अशोक हटकर, सफो/१५७० गणेश पाटील, पोहेकॉ/४१२२ शरद पाटील, पोहेकॉ/४८८ संदीप भोसले यांच्या पथकाने पार पाडली आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी